१ डिसेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन होणार? वाचा व्हायरल मेसेजमागचे सत्य

दिल्ली | कोरोनाबधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पूर्ण जगभरात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. भारतातही कोरोनाने थैमान घातले आहे.

काही ठिकाणी कोरोना आटोक्यात आला आहे. काही देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पण कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे आणि १ डिसेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याचे मेसेज काही दिवस झाले सोशल मीडियावर फिरत आहेत.

नरेंद्र मोदी लवकरच १ डिसेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन जाहीर करणार असल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र हा मेसेज खोटा आहे असे समोर आले आहे. पीआयबी फॅक्ट चेकमध्ये ही गोष्ट समोर आली आहे. आणि लोकांनीपण असे मेसेज फॉरवर्ड केले आहेत.

भारत सरकारने अशी कोणतीही घोषणा केली नाही असे स्पष्ट झाले आहे. असे मेसेज फॉरवर्ड करताना क्रॉस चेक करणे गरजेचे आहे. कारण हा दावा पूर्णपणे खोटा आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत चालला आहे. पण कोरोनाची दुसरी लाट येणार हे खरे आहे. तज्ञांनी हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बाहेर जाताना काळजी घ्या, सॅनिटाईझर वापरा, मास्क वापरा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका.

महत्वाच्या बातम्या-

प्री-वेडिंग शूटने घेतला जोडप्याचा जीव; आठवड्यापूर्वी झाला होता साखरपूडा तर महीन्यावर लग्न

…शेवटी आदित्य पंचोलीच्या धमक्यांना कंटाळून बोनी कपूरने पोलीस स्टेशनमध्ये केली होती तक्रार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.