भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी वटपौर्णिमा सणाच्या बाबतीत एक विधान केलं आहे. “वटपौर्णिमा हा महिलांचा सण आहे. तो फक्त सुवासिनींचा सण नाही आहे. त्यामुळे विधवा महिलांनी देखील वटपौर्णिमा साजरी करावी”, असं वक्तव्य भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केलं आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी झाडाची पूजा करण्यापेक्षा झाडे लावली पाहिजेत, असा सल्ला देखील तृप्ती देसाई यांनी दिला आहे.
यावेळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई म्हणाल्या की, “वटपौर्णिमा हा महिलांचा सण आहे. तो फक्त सुवासिनींचा सण नाही आहे. ज्या विधवा महिलांना आपल्या पतीसाठी ही पूजा करावी वाटते. त्या महिलांनी आवर्जून ही पूजा करावी, असे आवाहन मी सर्व महिलांना करते. विधवा महिलांनी आवर्जून ही पूजा करावी. कोणीही भेदभाव करू नये”, असे तृप्ती देसाई यांनी सांगितले आहे.
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की, “वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या महिलांनी वडाच्या तोडलेल्या फांद्यांची पूजा करण्यापेक्षा नवीन एखादे झाड लावण्याचा संकल्प करावा. या संकल्पामुळे आपल्याकडून पर्यावरणाचं रक्षण होईल”, असे देखील भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सांगितले आहे.
“ज्याप्रमाणे आपल्याला सत्यवानाची सावित्री समजली त्याचप्रमाणे जोतिबाची सावित्रीही समजली आहे. म्हणून सत्यवानाच्या सावित्रीचा जयघोष वटपौर्णिमेच्या दिवशी केला जातो. जोतिबाची सावित्री प्रत्येकाच्या हृदयात आहे. त्यामुळे मुली शिकत आहेत. प्रगती करत आहेत. सध्या महिला उच्च पदांवर काम करत आहेत”, असे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सांगितले आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील वटपौर्णिमा सणाच्या संदर्भात वक्तव्य केलं आहे. “वडाची पूजा करणारी सत्यवानाचे सावित्री जशी आम्हाला समजली मात्र स्वतःच्या अंगावर शेणाचे शिंतोडे उडवून घेणारी जोतिबाची सावित्री मात्र आम्हाला समजली नाही हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे”, असे वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं होतं.
यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या की, “जोतिबांच्या सावित्रींचा संघर्ष आपल्याला माहिती आहे. पण या संघर्षाला सावित्रीबाई सामोरे गेल्या म्हणून मी आज माझं मतं मांडू शकते”, असे देखील रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिलांना वृक्षारोपण करण्यास सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
“… त्यामुळे विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी”, तृप्ती देसाईंनी सांगीतलं यामागचं कारण
‘या’ अभिनेत्रीने सुशांतवर लावले होते लैंगिक छळाचे आरोप, पण नंतर वेगळेच सत्य आले होते समोर
देहूतील मोदींच्या कार्यक्रमात अजितदादांना भाषण का करू दिले नाही; देहू संस्थानने सांगीतले सत्य, म्हणाले..