मंदिरातले पुजारी अर्धनग्न, मग भक्तांच्या कपड्यांवर निर्बंध का?

मुंबई | साई दर्शनाला‌ जाताना भारतीय पेहरावात या असे आवाहन साईबाबा संस्थानने भाविकांना केले आहे. तसेच शिर्डीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तसा फलकच मंदिराबाहेर लावण्यात आला आहे.

याबाबत आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी प्रश्न विचारला आहे. मंदिरातले पुजारी अर्धनग्न असतात मग भक्तांच्या कपड्यांवर निर्बंध का घातले जात आहेत? असा सवाल आता तृप्ती देसाई यांनी साई संस्थानला विचारला आहे.

पुढे त्या म्हणाल्या, ‘मंदिरात येणारे भक्त हे देश-विदेशातून येतात. हे भक्त वेगवेगळ्या जातीचे आणि धर्माचे असतात. शिर्डी संस्थानने मंदिरात सभ्य पोशाख घालून यावे असे सांगितले आहे. मात्र भारताच्या घटनेने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, ‘मंदिरात प्रवेश करताना कोणत्या प्रकारचे कपडे असले पाहिजेत त्याचं भान भक्तांना आहे. भक्तांची श्रद्धा कपड्यांवरुन ठरवता येत नाही. श्रद्धा महत्त्वाची असते,’ असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. आता तृप्ती देसाई यांनी मांडलेल्या या भूमिकेने वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, शिर्डीत येणा-या भाविकांनी देखील संस्थानच्या या निर्णयाचे स्वागत केले असून धार्मिक ठिकाणी देवाचे दर्शन घेताना भारतीय पोशाख योग्य असल्याचे भाविकांनी म्हटले आहे. या निर्णयाचा मात्र काही भाविकांना मनस्ताप देखील सहन करावा लागतो आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
योगीजी! …मग फिल्म इंडस्ट्री नेण्याचा विचार करा; राष्ट्रवादी काँग्रेसचा टोला
‘आम्ही मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशला नेणार नसून नव्याने उभारणार आहोत’
‘ते’ विधान भोवलं! कंगनाला कायदेशीर नोटीस; ‘त्या वृद्ध महिलेची माफी न मागितल्यास…’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.