तृप्ती देसाईंचा बिग बॉसच्या घरात गौप्यस्फोट; म्हणाल्या आमच्या आंदोलनामुळेच इंदुरीकर महाराजांच्या…

बिग बॉस मराठी सीजन ३ च्या पर्वाला १९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठी सीजन 3 मध्ये चित्रपट, टीव्ही, संगीत आणि सोशल मीडियावरील निवडलेल्या लोकप्रिय सेलेब्सचे मिश्रण आहे आणि स्पर्धक 100 दिवसांसाठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.

दोन वर्षांनंतर चालू झालेल्या बिग बॉस सीजनची सर्वानाच उत्सुकता लागून होती. यंदाच्या सीजनमध्ये भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई सुद्धा या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या आहेत. दरम्यान तृप्ती देसाई शिवलीला पाटील, सुरेखा कूडची यांच्यासोबत गप्पा मारत असताना इंदुरीकर महाराजांविषयी बोलताना दिसून आल्या.

शिवलीला पाटील म्हणाल्या की, ‘मी म्हणताना असं म्हटलं की या तृप्ती ताई देसाई आहेत. यांनी इंदुरीकर महाराजांच्या विरोधात केस केली होती.” असे म्हणत शिवलीला यांनी मी पुराव्यांच्या आधारेच किर्तन करते असे सांगितले.

ते ऐकून तृप्ती देसाई म्हणाल्या की, ‘पण त्यांची बरीच किर्तने ही महिलांचा अपमान करणारी होती. आमच्या आंदोलनानंतर इंदुरीकर महाराजांची बरीचशी किर्तने यूट्यूबवरुन डिलिट केली गेली. म्हणजे जवळजवळ ८० टक्के किर्तने डिलिट केली.’ त्यानंतर यावर शिवलीला पाटील म्हणाल्या, ‘बऱ्याच किर्तनकारांनी डिलिट केली आहेत’ असे म्हटले. त्यावर उत्तर देत तृप्ती म्हणाल्या, ‘कारण तेव्हा मी ती मोहिमच चालवली होती. संपूर्ण जिल्हा माझ्या विरोधात उभा होता. मी जाणार म्हटल्यावर १०० किलो मिटर आधी पोलिसांनी मला आधीच ताब्यात घेतले.’

महिलांनी फेटा घालू नये असं इंदुरीकर महाराज म्हणाले होते. “महिलांनी फेटा घातला तर आम्ही काय गाउन घालायच का?” हे त्यांचं वक्तव्य चुकीचं होतं” असं तृप्ती देसाई यावेळी म्हणाल्या. शिवलीला या देखील फेटा घालतात. अनेक कार्यक्रमांमध्ये मला फेटा घातला जातो. त्यात गैर काय असं देखील तृप्ती देसाई म्हणाल्या.

बिग बॉसच्या घरात येताच स्नेहा मिरा आणि जय यांच्यामध्ये वाद होतानाचे आपण पाहिले त्यामुळे बिग बॉसच्या घरात आणखी काय पाहायला मिळते याकडे सर्वांची लक्ष लागून राहणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या
संघ संकटात असतानाही जेमिसन मात्र तरुणीसोबत स्मितहास्य करण्यात व्यस्त, तंबूतील तरुणीचा फोटो व्हायरल..
तुम्ही मला निर्वस्त्र कधी पाहिले? राखी सावंतचा विधानसभा अध्यक्षांना थेट सवाल
शिवसेनेचे नेते अनंत गीते बरोबर बोलले, नाना पटोलेंनी पुन्हा शरद पवारांना डिवचले
मोहन भागवत यांनी एकाच वाक्यात सांगितली हिंदुत्वाची व्याख्या, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.