Homeताज्या बातम्या“इंदुरीकरांवर कारवाई करा, अन्यथा अंधश्रद्धा पसरविण्यात ठाकरे सरकार सुद्धा सामील असे वाटेल”

“इंदुरीकरांवर कारवाई करा, अन्यथा अंधश्रद्धा पसरविण्यात ठाकरे सरकार सुद्धा सामील असे वाटेल”

प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज हे नेहमीच त्यांच्या किर्तनामुळे चर्चेत असतात. तसेच किर्तनात अनेकदा ते असे काही विधाने करुन जातात, ज्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकतात. आता पुन्हा एकदा ते त्यांच्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

इंदुरीकर महाराजांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात भाष्य केले आहे. मला कोरोना झाला नाही, कारण मी माळकरी आहे. आता तिसरी लाट माळ काढणाऱ्यांसाठीच आहे, असे इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. महाराजांच्या या वक्तव्यामुळे सगळीकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

राजकीय नेते महाराजांच्या विरोधात प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. अशात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या प्रकरणी इंदुरीकर महाराज आणि ठाकरे सरकारवर आक्रमक झाल्या आहे. इंदुरीकरांवर कारवाई करा, अन्यथा अंधश्रद्धा पसरविण्यात सरकारचे प्रतिनिधीसुद्धा सामील आहेत असे जनतेला वाटेल, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

मी माळकरी आहे म्हणून मला कोरोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना कोरोना गाठणारचं असे सांगून किर्तनाच्या माध्यमातून इंदुरीकर अंधश्रद्धा पसरवत आहेत. कोरोना ही महाभयंकर महामारी असून सध्या तिसरी लाट आपल्या देशात आहे, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

तसेच याआधी अनेक जणांना कोरोनामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. तर अनेक जण मृत्यूच्या दारातून बाहेर आले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.त्यातच सरकार सुद्धा जनजागृती करत आहेच, परंतु स्वतःला कीर्तनकार म्हणविणारे इंदुरीकर पुन्हा एकदा असे वक्तव्य करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत, असे म्हणत तृप्ती देसाई या इंदुरीकर महाराजांवर आक्रमक झाल्या आहे.

सरकारमधील नेते आणि विरोधी पक्षातील नेते यांनी ठेवलेल्या प्रवचनाला इंदुरीकर यांना बोलविले जाते. तिथे गर्दी जमा होते. आता लवकरच निवडणुका आहेत, केवळ म्हणूनच दरवेळी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न या सर्व नेत्यांकडून केला जातो, असे म्हणत तृप्ती देसाईंनी ठाकरे सरकारवरही निशाणा साधला आहे.

याआधी सुद्धा त्यांच्या कोरोनावरील वक्तव्यावर सरकारने कोणतीही कारवाई न करता सूट दिली होती. परंतु हिम्मत असेल तर आणि आपल्या राज्यात सर्वांना कायदा समान असेल तरच या सरकारने इंदुरीकरांवर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा अंधश्रद्धा पसरवण्यात सरकारसुद्धा सामील आहे असे जनतेला वाटेल, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
बापरे! सातवी पास युवकाने ३० हजारात बनवली ब्रिटिशकालीन फोर्ड गाडी..
“मराठी पाट्यांच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांचे वाटोळे होणार, त्यामुळे निर्णय रद्द करावा, अन्यथा…”
‘जोहान्सबर्गमध्ये जर विराट कर्णधार असता तर टिम इंडिया हारली नसती’, माजी क्रिकेटरचे मोठे वक्तव्य