वा रे पठ्ठ्या! ट्रक ड्रायव्हरच्या पोराने नीट परीक्षेत दुसरा नंबर काढत मिळवला एम्समध्ये प्रवेश

 

लातूर | शुक्रवारी रात्री उशिरा वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परिक्षेचा निकाल जाहिर झाला. या नीट परिक्षेत लातूरचा अभय चिल्लरगे ७०५ गुण मिळवून राज्यात दुसरा आला आहे.

अभियचे वडिल ट्रकचालक आहेत, घरची परिस्थिती हालाकीची आहे. असे असताना वडिलांच्या कष्टांना सार्थी लावत अभयने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. आता दिल्लीतील वैद्यकीय शिक्षणातील सर्वोच्च ‘एम्स’या संस्थेत अभय प्रवेश घेणार आहे.

अभय हा मुळ उदगीर येथील रहिवासी असून, तो राजर्षी शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. अभयला १० वीत ९६ टक्के गुण होते, तर किशोर वैज्ञानिक योजनेतही त्याने देशात ८८१ वा क्रमांक मिळवला होता.

घरी बसून ऑनलाईन तासिका, सराव परिक्षा हे सर्व नवीन होते, पण यश मिळवळ्याची जिद्द आणि कष्ट घेण्याची ताकद तुम्हाला मिळवून देते, असे अभयने म्हटले आहे. अभयला मेंदू विकारतज्ञ व्हायचे आहे.

अभयचा वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करण्याचाही मानस आहे. दरम्यान अभयने राज्यात दुसरा क्रमांक मिळवल्याने राज्याभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशात संस्थाध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील यांनी देखील अभयचे कौतूक केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

फेमस काॅमेडीयन राजू श्रीवास्तवला काम मिळणेही बंद झाले यामागे आहे हे धक्कादायक कारण

टिव्हीवरची छोटी काॅमेडीयन गंगुबाई आठवतीय? आता इतकी सुंदर दिसतेय की विश्वास बसनार नाही

८० वर्षांचा योद्धा अ‍ॅक्शन मोडमध्ये! बेजार बळीराजाच्या भेटीला थेट बांधावर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.