“अर्णबला अडकवण्यासाठी पोलिसांनी आमच्यावर दबाव टाकला, धमक्या दिल्या”

मुंबई | ठाकरे सरकारविरोधात भूमिका घेणारे अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर राज्य सरकार स्वतःच यामध्ये अडकत असल्याचे दिसून येत आहे. अर्णब यांना अटक करण्यासाठी केलेले प्रयत्न राज्य सरकारच्या चांगलेच अंगलट येताना दिसत आहेत.

ज्या टीआरपी घोटाळ्यात अर्णब गोस्वामी यांना घेरण्यात आले होते त्याच टीआरपी घोटाळ्यातील तक्रारदारांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अर्णब गोस्वामी यांना अडकवण्यासाठी पोलीस आमच्यावर दबाव टाकत होते अशी माहिती त्यांनी न्यायालयाला दिली आहे.

धक्कादायक म्हणजे अर्णब यांना अटक करण्यासाठी गेलेले पोलीस अधिकारी सचिन वझे आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची नावे याचिकेत दाखल करण्यात आली आहेत.

हंसा टीआरपी रिसर्च कंपनी ही टीआरपी विषयी रिसर्च करण्याचे काम करते. याआधी हंसा कंपनीने एका कर्मचाऱ्याला बळजबरीने इंडिया टुडे ग्रुपने टीआरपी फुगविण्याचे प्रयत्न केले होते अशी माहिती पोलिसांना दिली होती.

या घोटाळ्यात अर्णब गोस्वामी व त्यांच्या रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचा समावेश आहे अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली होती. पण प्रत्यक्षात प्रत समोर आल्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या अंगलट आले होते.

तरीही यामध्ये अर्णब गोस्वामी यांचा समावेश आहे असं मुंबई पोलीस वारंवार सांगत होते. संपूर्ण प्रकरणातील तक्रारदार हंसा रिसर्च यांच्यावर अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्ही यांच्याविरोधात खोटे जबाब लिहुन देण्यासाठी दबाव टाकण्यात आला.

१२-१२ तास आम्हाला बसवून ठेवले जायचे तसेच आम्हाला अटक करण्याची धमकीही देण्यात आली असा गंभीर आरोप मुंबई पोलिसांवर हंसा रिसर्च कंपनीने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्णब गोस्वामी यांना टीआरपी घोटाळ्यात अटक करण्याची योजना ७ किंवा ८ तारखेला ठरली होती.

पण सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांना हंसा रिसर्च कंपनीकडून जबाब नोंदविणे शक्य झाले नसावे. आता हंसा रिसर्च कंपनीने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.