जवानानं वाचवलं तलावात बुडणाऱ्या हरणाच्या पाडसाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

नवी दिल्ली। सध्या सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक थरारक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओना युजर्स मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असतात. काही मजेशीर व्हिडिओ एकदा बघून मन भरत नसल्याने अनेकजण ते व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये संग्रहित करून ठेवतात.

मात्र सध्या प्राण्यांचे रेस्क्यूचे व्हिडिओ आजकाल चांगलेच व्हायरल होतात. अशातच अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका सैनिकाने हरणाच्या पाडसाला वाचवले आहे. व त्याला जीवदान दिले आहे. हा व्हिडिओ सध्या भन्नाट व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ Buitengebieden नावाच्या युजरनं अपलोड केला आहे. 11 जून रोजी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, तलावाच्या मध्यभागी एका झाडाचं खोड आहे, ज्यावरुन एक लहान हरण घसरुन त्या तळ्यात पडतं. मात्र, इतक्यात एक सैनिक तिथे पोहोचतो आणि या हरणाला पाण्यातून बाहेर काढतो.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून आतापर्यंत 44 हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हरणाचा जीव वाचवणाऱ्या सैनिकाचे कौतुक केलं जात आहे. मात्र काहींनी या व्हिडिओवर कमेंट करून सैनिकांवर संशय घेतला आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘मीदेखील एक सैनिक आहे.’ तर दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले आहे, की मला खात्री आहे की व्हिडिओमध्ये दिसलेल्या या सैनिकानं मानवांसाठीही असंच केलं असतं.

मात्र, काही लोक शंकेच्या नजरेनं पाहात आहेत. एका युजरनं लिहिलं, मी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या सैनिकानं हरणाला जमिनीवर ठेवलेलं व्हिडिओमध्ये दिसलं नाही. हा व्यक्ती त्याला शिजवून खाण्याच्या मूडमध्ये तर नाही ना? असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या
पाच वर्षे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपद राहणार कारण…, संजय राऊत यांचा विश्वास
जया बच्चनने संजीव कुमारला भिकारी समजून सेटवरुन काढले होते बाहेर; वाचा पुर्ण किस्सा भारीच! भाभीजीने हरयाणवी गाण्यावर साडी घालून केला डान्स; लाखो लोकं झाले डान्सचे फॅन
अमिताभ बच्चनला धडा शिकवण्यासाठी राजीव गांधींनी राजेश खन्नाची घेतली होती मदत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.