साऊथची टॉपची अभिनेत्री तृषा आणि राणा दग्गूबत्तीचे ‘या’ कारणामूळे होऊ शकले नाही लग्न

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आजकाल सगळीकडे प्रसिद्ध आहेत. साऊथसोबतच बॉलीवूडमध्ये देखील त्या कलाकारांना पसंत केले जाते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे तृषा कृष्णा. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री तृषा बॉलीवूडमध्ये देखील खुप हिट आहे.

४ मे १९८४ ला चैन्नईमध्ये जन्मलेली तृषा आजच्या घडीची सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याअगोदर तृषाने अनेक ब्यूटी स्पर्धा जिंकल्या होत्या. एवढेच नाही तर तृषाने मिस चेन्नईची स्पर्धा जिंकली होती. मिस चैन्नई झाल्यानंतर तिचे आयूष्य बदलून गेले होते.

मिस चैन्नईची स्पर्धा जिंकल्यानंतर तृषा पहील्यांदा फाल्गूनी पाठकच्या अल्बममध्ये दिसली होती. मेरी चुनर उड उड जाये अल्बममधून तृषाने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. या गाण्यामूळे तृषा रातोरात स्टार झाली होती. मेरी चुनर उड उड जाये गाण्यात तृषासोबत आयशा टाकिया दिसली होती.

पहील्याच गाण्यात एवढे यश मिळाल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. २००२ मध्ये ‘मौनम पैसीयाड’ चित्रपटातून तिने साऊथ इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. पण हा चित्रपट खास यश मिळवू शकला नाही. २००३ मध्ये रिलीज झालेल्या ‘सीमा’ चित्रपटाने तिला खरे यश मिळवून दिले.

त्यानंतर तृषाने मागे वळून न पाहता एका पेक्षा एक हिट चित्रपटामध्ये काम केले. प्रभाससोबत आलेल्या ‘वर्षम’ चित्रपटाने तृषाला साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये सामील केले. तेलगूसोबतच तिने तामिळ चित्रपटांमध्ये देखील काम केले आणि तिला तिकडे देखील यश मिळाले.

तामिळमध्ये अभिनेता विजयसोबत तिची जोडी खुप पसंत केली गेली. दोघांनी अनेक चित्रपट एकत्र केले. तृषा दिवसेंदिवस यशस्वी होत होती. त्यामूळे तिने अभिनयामध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांमध्येच तृषा तेलगू आणि तामिळ इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री बनली.

त्यामूळे तिच्या अभिनयाचे आणि सुंदरतेचे चर्चे सगळ्या भारतात होऊ लागले. याच कालावधीमध्ये तिला बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. खट्टा मिठ्ठा चित्रपटातून तिने अक्षय कुमारसोबत बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. हा चित्रपट हिट झाला आणि तृषा बॉलीवूडमध्ये हिट झाली.

यशस्वी अभिनेत्री असली तरी तृषाने बॉलीवूडमध्ये खुप कमी दिवस काम केले. चित्रपटांसोबतच तृषा तिच्या अफेअर्समूळे देखील खुप चर्चेत होती. साऊथ इंडस्ट्रीतील मोठ मोठ्या अभिनेत्यांसोबत तृषाते नाव जोडले गेले होते. सुरुवातीला अभिनेता राणा दग्गूबत्तीसोबत तिचे नाव जोडले गेले.

दोघांनी लग्नाची तयारी केली होती. पण काही कारणामूळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. त्यानंतर सुपरस्टार विजससोबत देखील तिच्या अफेअरच्या बातम्या आल्या. पण ह्या ही बातम्या खोट्या ठरल्या. तृषा सध्या सिंगल आहे आणि करिअरवर लक्ष देत आहे.

महत्वाच्या बातम्या –

चित्रपटांपासून दुर राहून खुप आलिशान आयूष्य जगतेय राणी मुखर्जी; आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण
मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का, या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे कोरोनामुळे निधन
अरे देवा! अभिनेते मेहमूदने एका चित्रपटात त्यांच्या सख्या बहीणीसोबत केला आहे रोमान्स
सुंदर असूनही बॉलीवूडमध्ये यशस्वी होऊ शकल्या नाहीत ‘या’ अभिनेत्री

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.