आयपीएल २०२२ हंगामातील काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा पराभव केला आहे. आता २९ मे रोजी आयपीएल २०२२ चा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये होणार आहे. कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा खेळाडू ट्रेंट बोल्टने(Trent Bolt) उत्तम गोलंदाजी केली.(Trent bolt fan gift viral video on social media)
त्याने ४ षटकांत २८ धावा देत एक विकेट घेतली. पण या सामन्यानंतर ट्रेंट बोल्टने असे काही केले आहे, ज्याची चर्चा सध्या होत आहे. या कृतीमुळे ट्रेंट बोल्टने करोडो चाहत्यांची मने जिंकली आहेत. सामना संपल्यानंतर ट्रेंट बोल्ट पायऱ्या चढून ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होता. त्यावेळी एक मुलगा त्याच्याजवळ आला आणि त्याने ट्रेंट बोल्टने घातलेली जर्सी मागितली.
लहान मुलाने केलेल्या मागणीनंतर ट्रेंट बोल्टने लगेचच जर्सी काढली आणि त्या लहान मुलाला दिली. ट्रेंट बोल्टकडून जर्सी घेतल्यानंतर त्या लहान मुलाचा आनंद गगनात मावत नव्हता. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
How can you not love Trent Boult? 😍
Watch him make a young fan's day after #RRvRCB. 💗 pic.twitter.com/YrWgRsAgsN
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 28, 2022
या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेक युजर्सनी या व्हिडिओला लाइक देखील केले आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने २० षटकांत १५७ धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्स संघाकडून प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेद मॅकॉय यांनी शानदार गोलंदाजी केली.
राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू प्रसिद्ध कृष्णाने ४ षटकात २२ धावा देत तीन विकेट घेतल्या. तर ओबेद मॅकॉयने देखील रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या तीन महत्वाच्या खेळाडूंना माघारी परतवले. राजस्थान रॉयल्सला विजयासाठी १५८ धावांची गरज होती. राजस्थान रॉयल्सने १८.१ षटकातच १५८ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. राजस्थान रॉयल्स संघाकडून जॉस बटलरने शतक ठोकत १०६ धावा केल्या.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा खेळाडू जोस बटलरला सामनावीराचा किताब देण्यात आला. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत जोस बटलरने विराट कोहलीची बरोबरी केली आहे. जोस बटलरच्या नावावर सध्या 5 शतक आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक ६ शतके झळकावली आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
राणा दाम्पत्य आणि भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद; भीम ब्रिगेड म्हणतंय, हनुमान चालिसा नको, तर…
आगामी काळात देशाचा पंतप्रधान मीच होणार; ‘रासप’च्या महादेव जानकरांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
भाजपा मंत्र्याने स्वत:लाच लोखंडी साखळीनं मारले; लोकांनी पैसे उडवले, वाचा नेमकं काय घडलं?