Share

सुशांतच्या चाहत्यांनी सुरू केला बॉयकॉट पठाणचा ट्रेंड, म्हणाले, आमिरचा घमंड तोडला, आता शाहरुखची वेळ

shaharukh khan

शाहरुख खान सध्या त्याच्या पठाण या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. यापूर्वी तो उमराह करण्यासाठी आणि माँ वैष्णोदेवीच्या दर्शनासाठीही पोहोचला होता. त्यानंतर हा अभिनेता पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाला. त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटामुळे तो खूप चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण दिसणार आहे.

या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे काल रिलीज झाले आहे. ज्याचे सर्वत्र कौतुक होत होते. या गाण्याचे व्ह्यूज काही वेळातच लाखांवर पोहोचले होते, मात्र आता सोशल मीडियावर शाहरुखच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. अलीकडेच किंग खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले.

त्यानंतर यूजर्सने चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू केली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे चाहते ट्विटरवर ‘बॉयकॉट पठाण’ ट्रेंड करत आहेत. तसेच दीपिका पदुकोणच्या गाण्यातील लूकवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या ट्विटरच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये ‘बॉयकॉट पठाण’ हा ट्रेंड आहे.

यूजर्स या गाण्यावर जोरदार टीका करत आहेत. एवढेच नाही तर या गाण्याचे मुख्य कलाकार शाहरुख आणि दीपिका यांचीही बदनामी केली जात आहे. युजर्स गाण्यात दाखवण्यात आलेले सीन आणि आउटफिट या दोन्ही गोष्टींबद्दल टोमणे मारत आहेत.

एवढेच नाही तर युजर्स शाहरुखचे जुने व्हिडिओ काढून त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत आणि त्याच्या तीर्थक्षेत्रांवर जाण्यावरही प्रश्न उपस्थित करत आहेत. सोशल मीडियावर शाहरुखचा जुना व्हिडिओ शेअर करत एका यूजरने लिहिले की, ‘मीही पठाण आहे, जेव्हा पाकिस्तान जिंकतो तेव्हा मला वाटते की माझ्या वडिल जिंकले आहे शाहरुख खान.

ऐकलंय की त्याचा पठाण चित्रपट येतोय, तो यशस्वी करण्यासाठी तो माता राणीच्या दरबारात गेला आहे. याच्या खाली त्यांनी लिहिलं होतं ‘बॉयकट पठाण’. दुसरीकडे, दुसर्‍या युजरने आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा आणि शाहरुख खानच्या ‘पठाण’चे पोस्टर शेअर केले आणि लिहिले की, ‘एकाचा घमंड तुटला आहे, तर आता दुसऱ्याचा तोडायचा बाकी आहे’.

काही यूजर्सनी दीपिकाच्या बिकिनी लूकवर अश्लील कमेंट्सही केल्या आहेत. एकाने लिहिले- ‘बेशरम लोकांनो, हा आता कौटुंबिक सिनेमा नाही राहिला. चला अस मानु की खानचे चमचे पहिल्याच आठवड्यात सिनेमागृहात जातील. पण दुसऱ्या आठवड्यात पठाणला कोण वाचवणार? इतकंच नाही तर काहींनी त्यात भगवा रंग ओढून अभिनेत्रीच्या केशरी बिकिनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महत्वाच्या बातम्या
पुजारा-अय्यरने बांगलादेशच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले, पहिल्या दिवशी भारताने मारली मोठी मजल
मोदी सरकारचा मोठा निर्णय; संपुर्ण देशभरातील टोलनाके होणार बंद, वाचा सविस्तर..
अर्जून तेंडूलकरने पदार्पणाच्या सामन्यातच धडाकेबाज शतक झळकावत केली गोलंदाजांची धुलाई

इतर ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now