आमदार आणि एसटीमधून प्रवास करतोय? कंडक्टरचा विश्वास बसेना, यानंतर गणपतराव देशमुख यांनी…

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. यामुळे एक एकनिष्ठ व्यक्ती राजकारणातून निघून गेला. गणपतराव देशमुख यांना संपुर्ण राज्यात आबा या नावाने संबोधले जायचे.

ते ९४ वर्षाचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून गणपतराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु होते. शेतकरी कामगार पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते. प्रचंड साधी राहणीमान असलेले ते नेते होते. नेहमी एसटीने फिरणाऱ्या गणपतरावांनी कधीच बडेजाव केला नाही.

गणपतराव देशमुख हे अत्यंत साधे होते. मुंबईतील विधानसभेचे अधिवेशन असो की नागपूरचे हिवाळी अधिवेशन ते प्रत्येक अधिवेशनाला एसटीनेच जात होते. २०१७ मध्ये झालेल्या नागपूर अधिवेशनालाही ते एसटीनेच आले होते. ते कुठेही जायचे असेल तर एसटीनेच जायचे.

एसटी प्रवासाचा नियम त्यांनी मोडला नाही. तो शिरस्ता त्यांनी कायम ठेवला. एकदा एसटीने प्रवास करत असताना त्यांना कंडक्टरने तिकीट विचारले. त्यावर मी आमदार आहे, असे गणपतराव म्हणाले. आमदार आणि एसटीतून प्रवास करतोय? यावर कंडक्टरचा विश्वासच बसेना.

त्याने गणपतरावांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. अखेर त्याने डेपोतील अधिकाऱ्यांना बोलावले. अधिकाऱ्यांनी गणपतरावांना ओळखले. त्यांची माफी मागितली अन् गणपतरावांचा प्रवास सुकर झाला. गणपतराव देशमुखांनी महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणुक लढवली आणि ते जिंकलेही.

त्यानंतर दोन निवडणूका सोडल्या तर तब्बल ११ वेळा ते आमदार झाले. म्हणजे ५० वर्षांहून अधिक काळ ते विधानसभेचे सदस्य राहिले. या काळात त्यांनी दोन वेळा मंत्री म्हणून काम केले. विशेष म्हणजे लोकांच्या हिताची काम करण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला.

ताज्या बातम्या

धक्कादायक! ओळख ना पाळख, फक्त डोळ्यात डोळे घालून बघितल्यामुळे तरुणाची हत्याराने वार करत हत्या

चार्जिंगच नो टेन्शन! फक्त १० मिनिटांत फुल चार्ज होणार इलेक्ट्रिक कार, चार्ज केल्यावर चालणार १००० किमी

नर्सकडून २ महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण, बाळाचा हात फ्रॅक्चर; सीसीटीव्हीतून झाला खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.