बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या मुंबईमधील कार्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात प्रसिद्ध असलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना मोठा झटका बसला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्र सरकारने चेन्नईला बदली केली असल्याची माहिती मिळत आहे. समीर वानखेडे( Sameer Wankhede) हे एनसीबीचे मुंबई प्रादेशिक प्रमुख होते. (Transfer of NCB officer Sameer Wankhede )
मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची मुंबईहून चेन्नईला बदली करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मुंबई शहराच्या किनारपट्टीवरील कार्डेलिया क्रूझ जहाजावर एनसीबीने छापा टाकला होता. या छाप्यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती.
या प्रकरणात आर्यन खान जवळपास २६ दिवस तुरुंगात होता. पण त्यानंतर आर्यन खानला जामिन मिळाला. काही दिवसांपूर्वीच एनसीबीने कार्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणात आर्यन खानविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे एनसीबीने सांगितले आहे. आर्यन खानसोबत सहा जणांना कार्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे.
समीर वानखेडे यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. एका वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सध्या अधिकारी तपास करत आहेत. यामध्ये तथ्य आढळ्यास समीर वानखेडे यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
कार्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर तपास आणि कारवाईत दिरंगाई केल्याचा आरोप करण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारमधील तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवली आहे, असा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला होता.
यासंदर्भातील कागदपत्रे देखील मंत्री नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांसमोर सादर केली होती. समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा देखील मंत्री नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडला होता. निकाहनामामध्ये समीर वानखेडे यांचे नाव ‘समीर दाऊद वानखेडे’ असे असल्याचा दावा मंत्री नवाब मलिक यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या :-
शरद पवारांनी होळकरांच्या जमिनी ढापल्या; गोपीचंद पडळकरांचे पवारांवर पुन्हा गंभीर आरोप
दूध देणे बंद केल्यानंतर गायींना बेवारस सोडले, तर दाखल होणार गुन्हा; सरकारचा मोठा निर्णय
काँग्रेस देणार ठाकरे सरकारला धक्का, शिर्डीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत






