मोठी बातमी! आता Whatasapp वरून पैसे ट्रान्सफर करता येणार, जाणून घ्या कसे…

व्हॉट्सअ‍ॅपने आता आपल्या वापरकर्त्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. यामध्ये आता व्हॉट्सअ‍ॅपने गेल्या वर्षी आपल्या युजर्ससाठी पेमेंट प्लॅटफॉर्म लाँच केला होता. आता कंपनी त्यात काही बदल करीत आहे. WABetaInfo च्या अहवालानुसार हे फीचर सुरू झाल्यावर भारतीय व्हॉट्सअ‍ॅप युजर्स कोणत्याही पेमेंट विनंतीशिवाय यूपीआय पेमेंट करू शकणार आहेत.

यामध्ये युजर्स यूपीआय पेमेंटद्वारे त्यांच्या मित्रांना आणि संपर्कांतील लोकांना पैसे पाठवू शकतात. याशिवाय, युजर कॉन्टॅक्ट्सना पेमेंट रिक्वेस्ट्सदेखील पाठवू शकतात. आता येणारे नवं फीचर कोणत्याही कॉन्टॅक्टसाठी हे पेमेंटचा पर्याय इनेबल करुन देईल.

यासाठी तुमचे बँक अकाऊंट डिटेल अपडेट झाल्यानंतर तुम्ही पैसे ट्रान्सफर किंवा रिसीव्ह करु शकता. काँटॅक्ट लिस्टमधील ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत, त्याचे चॅट ओपन करुन पेमेंट ऑप्शनवर जा. ज्या बँक अकाऊंटमधून पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, ते सिलेक्ट करा

याठिकाणी रक्कम टाकून ट्रांझॅक्शन पूर्ण करण्यासाठी तुमचा UPI पिन टाका. पिन टाकल्यावर कन्फर्मेशन मेसेजसोबतच तुमचे ट्रांझॅक्शन सक्सेसफुल होईल, आणि तुम्ही कोणालाही घरबसल्या पैसे पाठवू शकता.

यामुळे इन्स्टंट मेसेज अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवरुन (Whatsapp) येत्या काही दिवसांत UPI पेमेंटही करता येईल. याबाबत आपली माहिती गोपनीय ठेवावी, जेणेकरून आपली कधी फसवणूक होणार नाही. यामुळे येणाऱ्या काळात आपण लगेच कोणालाही पैसे पाठवू शकता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.