तारक मेहता फेम अभिनेत्याचा भीषण अपघात

मुंबई। छोट्या पड्यावरील लोकप्रिय व विनोदी मालिका ‘तारक मेहता उल्टा चष्मा’ या मालिकेनं गेली अनेक वर्षे लोकांचे मनोरंजन केले आहे. जवळजवळ 13 वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनात आपली छाप पाडत आहे. यातील प्रत्येक कलाकार हे त्यांच्या मालिकेतील नावामुळे ओळखले जात आहेत.

अशातच आता या मालिकेतील एका कलाकाराबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मालिकेतील कलाकारांपैकी एका अभिनेत्याचा अपघात झाला असून त्यातून तो सुदैवाने बचावला आहे. ‘तारक मेहता उल्टा चष्मा’ या मालिकेतील अभिनेता प्रशांत बजाजच्या कारचा अपघात झाला आहे.

मुंबईच्या एमटीएनएल जंक्शनवर त्याच्या कारचा अपघात झाला. परंतू प्रशांत या अपघातातून बचावला आहे. या प्रकरणी प्रशांतच्या गाडीला धडक देणाऱ्या रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘या अपघातातून मी थोडक्यात वाचलो व त्यासाठी मी देवाचे आभार मानतो. मला वाटलं की मी माझा पाय गमावला आहे. मी सुन्न होतो पण नंतर लोक तिथे होते. त्यांच्यामुळे मी सुखरूप घरी येऊ शकलो…’ प्रशांतच्या कारला धडक देणाऱ्या रिक्षाचालकाची प्रकृती देखील स्थिर आहे. अशी माहिती प्रशांतने दिली.

या आधीही अभिनेता रजत बेदीच्या कारचा अपघात झाला होता व या अपघातात जखमी झालेल्या 2 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. प्रशांतने ‘आयुष्मान भव’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा प्रत्येक घरातला आवडता शो आहे. हा शो 13 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या सर्व कलाकारांनी लोकांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.
महत्वाच्या बातम्या
“काका-पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली, जय मल्हार”
केबीसीतील स्पर्धकाने शाहरुखची चांगलीच जिरवली, मिठी मारण्यास नकार देत अभिनयावरूनही झापले 
करीनाने भुमिका नाकारल्यानंतर ‘सीता’च्या भुमिकेत दिसणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, पोस्टर आला समोर
‘सोमय्या बिल्डरांसाठी काम करतात, त्यातून त्यांच्या संस्थेला निधी मिळतो, आरोपाने राज्यात खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.