‘मुख्यमंत्री साहेब, तुमच्या वाहतुक पोलिसांना भिक मागायचा धंदा बंद करायला सांगा’

मुंबई | राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारवर बरीच टीका होत आहे. अशात आता महाराष्ट्र पोलिसांच्या संदर्भातील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका ड्रायव्हरचा आहे.

गेल्या काही दिवसात करुणा शर्मा, पूजा चव्हाण, महेबूब शेख, मनसुख हिरेन यांसारख्या प्रकरणामुळे राज्याचे गृह खाते चांगलेच अडचणीत आले. याबाबतच्या प्रश्नांवर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. पण राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलिसांच नेहमीच कौतुक केलं आहे.

दरम्यान, पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थिती करणारा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तेलंगाना राज्यातील एका गाडी चालकाचा आहे. व्हिडीओत ड्रायव्हरने महाराष्ट्र राज्याच्या वाहतूक पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

व्हिडीओत ड्रायव्हर थेट पोलिसांवर आरोप केले आहेत. आम्ही तेलंगाना राज्यातून आपल्या राज्यात आलो आहोत, आल्या नंतर आमच्याकडे आमच्या गाडीचे सर्व कागदपत्र असतात तरी सुद्धा तुमचे वाहतूक पोलीस अधिकारी जबरदस्ती पैसे वसुली करून मारत आहेत.

महाराष्ट्रात आमच्यासोबत होणाऱ्या या गोष्टीमुळे आम्ही खूप दुखी आहोत. तुमच्या राज्यात आम्ही फिरण्यासाठी येत असतो. शिर्डी, मुंबई, कोल्हापूर मंदिर विठ्ठल मंदिराला भेट देतो. पण बाहेरच्या राज्यातील गाडी पाहिली की तुमचे पोलीस अडवतात. हे काय आहे? असा सवाल या ड्रायव्हरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

त्याच्या म्हणण्यानुसार, सर्व पेपर आहेत तरी पण १२००,६००,२०० चे पावती फाडतात आणि मारतात. तुमच्या वाहतूक पोलिसांना काय अडचण आहे विचारा, कशाचे पैसे भरायचे हे भिक मागणे सोडून द्या म्हणा, असा आरोप चालकाने केला आहे.

याशिवाय, तुम्ही आमच्या राज्यात या बघा आमचे पोलीस थांबवत नाहीत पेपर दाखवा आणि जा असे सांगतात. आमचे पोलिस भिकार धंदे करत नाहीत. तुमचे पोलीस का मारतात, त्यांना का अडचण आहे. विचारा त्यांना काय पैसे कमी पडत असतील तर १२ तास नोकरी करून त्यानंतर त्यांना भिक मागायची नोकरी करा म्हणा.

संतप्त ड्रायव्हरने थेट मुख्यमंत्री ठाकरे यांना सवाल केला आहे. तो म्हणतो आम्ही काय भारतीय नागरिक नाहीत काय? मी चुकून जास्त बोललो असेल तर मला माफ करा, आमच्या राज्याला भेट देऊन चांगली वाहतूक व्यवस्था आणि चांगले रस्ते कसे असावेत याबाबत आमच्या मुख्यमंत्र्यांकडून मार्गदर्शन घेण्याचा सल्ला त्या ड्रायव्हरने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-
सहाच्या सहाही बहिणी झाल्या पोलिस; फडकवला घराण्याचा झेंडा
विराटने रोहित शर्माला वगळल्याने उडाला ‘भडका’; मुंबई इंडियन्सने केलं ‘हे’ ट्विट
खासदार म्हणतात, बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ४०० कोटी खर्च करण्यापेक्षा ४ रूग्णालय उभारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.