‘WHO नं सांगितलं कोरोना लशीत विष मिसळा’, राष्ट्राध्यक्षांचा धक्कादायक दावा

मुंबई | देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. अशातच सर्वांचे लक्ष कोरोना लसीकडे लागले आहे. तर दुसरीकडे धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोरोना लशीत विष मिसळण्यासाठी WHO नं पैसेही ऑफर केल्याचा दावा राष्ट्राध्यक्षांनी केला आहे.

राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. obrempongnana.wordpress.com च्या वृत्तानुसार राष्ट्राध्यक्ष एंड्री राजोइलिना म्हणतात, ‘आमचा देश मेडागास्करनं कोरोनाव्हायरस विरोधातील उपचार शोधले आहेत. मात्र युरोपियन लोकांनी माझ्या आफ्रिका देशातील मित्रांना मारण्यासाठी यामध्ये विषारी घटक मिसळण्यास सांगितले, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे.

तसेच ते पुढे म्हणतात, विषारी घटक मिसळण्यासाठी लाचही देण्याचा प्रयत्न केला. २०, ०००,००० डॉलर्सचा प्रस्ताव ठेवला आहे. लोकांनी सावध राहायला हवं. जागतिक आरोग्य संघटना आमची मदत करेल म्हणून आम्ही त्यांच्याशी जोडले गेलो, मात्र ते आमची मदत करत नाही आहेत.’

दरम्यान, आफ्रिकन नागरिकांनी युरोपियन लोकांची कोरोना लस वापरू नये, कारण ही लस कोरोनावर उपचार करत नाही तर जीव घेते आहे, असे आवाहन मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष एंड्री राजोइलिना यांनी नागरिकांना केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
देशात कोरोनाची दुसरी लाट? तज्ञ म्हणतात, कोरोना लसीशिवाय पर्याय नाही
बाबो! मरण्याआधी आजींनी शेजाऱ्यांची केली चांदी, तब्बल ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती केली नावावर
लग्नाच्या ५ व्या दिवशीच आदित्यची बायकोला माहेरी हाकलण्याची धमकी; कारण ऐकून बसेल धक्का

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.