महाराष्ट्र हादरला! नराधमाचा सात वर्षीय चिमूरडीवर अत्याचाराचा प्रयत्न; दाताने चावून ओठ तोडला

महाराष्ट्रातील औरंगाबादमधील एक लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. ७ वर्षीय चिमूरडी मिस्त्री काम करणाऱ्या मामा आणि आजीकडे राहायला गेली होती. तिथे तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला.

ही चिमूरडी औरंगाबादमधील वडगाव येथे मामा आणि आजीकडे गेली होती. त्यावेळी गुरुवारी रात्री १ च्या सुमारास आरोपी मुलीला घरातून पांघरूणासोबत घेऊन गेला. जवळ असणाऱ्या रिकाम्या फ्लॅटमध्ये त्या मुलीला नेण्यात आले.

तिथे त्या सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी आरोपीने चिमूरडीचा ओठ दाताने चावून तोडला. मुलीच्या ओरडण्याने शेजारील लोक जमा होतील. म्हणून आरोपीने तिथून पळ काढला.

तातडीने या घटनेची माहीती पोलिसांना देण्यात आली. मुलीला रक्तबंबाळ अवस्थेत नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

हाथरस प्रकरणामूळे देश तापलेला आहे. अशातच या घटनेने महाराष्ट्राला हादरून टाकले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीला लवकरच पकडण्या येईल.

महत्त्वाच्या बातम्या –

जेव्हा ती तुम्हाला सांगते, जा आणि दरवाजाची कडी लाव; पहा आर्चर काय म्हणतोय विराटला..

दिवसभर काम करायचा आणि रात्री एकटा रडत बसायचा बॉलीवूडचा ‘हा’ सुपरस्टार

मोटारसायकलचे नियम सरकारने बदलले ; डबल सीटच्या नियमासह महत्वाचे ५ बदल जाणून घ्या..

सचिनची मुलगी सारा तेंडूलकर शुभमन गिलची पत्नी? पहा कसं काय घडलं हे…

ड्रग्ज प्रकरणात बाॅलीवूडचा आणखी एक प्रसिद्ध अभिनेता अडकला; पोलीसांचा थेट घरावर छापा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.