७० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्रीची आज झाली आहे ‘अशी’ अवस्थता; पहा फोटो

लांब केस, सुंदर डोळे आणि गोड हास्याने सर्वांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री राखी. ७० च्या दशकामध्ये त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सुंदरतेने फिल्म इंडस्ट्रीला वेड लावले होते. पण आज त्या फिल्म इंडस्ट्रीपासून खुप लांब आहेत.

राखी मुंबईच्या असणाऱ्या त्यांच्या फार्म हाऊसमध्ये त्यांचे आयुष्य जगत आहेत. त्या फार्म हाऊसमध्ये शेती करतात. पशुपालक करतात. त्यासोबतच तिथे असणाऱ्या लहान मुलांना त्या शिकवतात. लाईमलाईटपासून लांब राहायला त्यांना आवडते.

७० आणि ८० च्या दशकात आपल्या सुंदरतेने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री आज या सर्व गोष्टींपासून लांब राहतात. जाणून घेऊया रेखाच्या आयुष्यात असे काय झाले? ज्यामुळे त्यांनी लाईमलाईटपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला.

रेखाचा जन्म १९४७ मध्ये झाला होता. फाळणीनंतर त्यांचे सगळे कुटुंब पश्चिम बंगालमध्ये राहत होते. वयाच्या पंधराव्या वर्षी राखीचा विवाह झाला होता. त्यांचे पहिले लग्न बंगाली दिग्दर्शक अजय बिश्वाससोबत झाले होते. पण काही दिवसांनी हे दोघे वेगळे झाले.

असे बोलले जाते की, राखीच्या घरात सगळीकडे चित्रपटांचे वातावरण असायची. ती गोष्ट राखीला आवडत नव्हती. म्हणून त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण नंतर राखी अभिनय क्षेत्राची खुप चांगल्या पद्धतीने जोडल्या गेल्या.

१९६८ साली राखीने पहिल्यांदा ‘बंधू बरण’ या बंगाली चित्रपटामध्ये काम केले. या चित्रपटातील अभिनयासाठी राखीचे खुप जास्त कौतुक करण्यात आले. त्यानंतर त्यांना बॉलीवूड चित्रपटांच्या ऑफर येणे सुरू झाले.

राखीने ‘जीवनमृत्यू’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेते धर्मेंद्र मुख्य भुमिकेत होते. त्यानंतर राखीचा शशी कपूरसोबत ‘शर्मीली’ चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात त्यांच्या सुंदरतेचे आणि अभिनयाचे लोक वेडे झाले.

या चित्रपटानंतर राखीने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी हिरा पन्ना, डाग, तपस्या, ब्लॅकमेल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अमिताभ बच्चनसोबत राखीने चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यांना यश देखील मिळाले. ‘कभी कभी’ हा राखीच्या करिअरमधला सर्वोत्तम चित्रपट मानला जातो.

राखीने त्यांच्या करिअरमध्ये अनेक वेगवेगळ्या भुमिका निभावल्या होत्या. त्यांनी अमिताभ बच्चनसोबत उत्तम केले होते. त्यानंतर ‘शान’ चित्रपटात त्यांनी अमिताभच्या भाभीची भुमिका निभावली. तर ‘शक्ती’ चित्रपटाने त्यांच्या आईची भुमिका निभावली.

याच कालावधीमध्ये राखीच्या आयुष्यात गुलझार यांची एन्ट्री झाली. सुरुवातीला तर राखीने त्यांच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. पण जास्त काळ त्या गुलझार यांच्यापासून लांब राहू शकल्या नाहीत. त्या गुलझारच्या प्रेमात पडल्या.

१९७३ मध्ये गुलझार आणि राखीने लग्न केले. पण लग्नासाठी गुलझार यांनी एक अट ठेवली होती. ही अट होती राखी लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम करणार नाहीत. राखीने देखील ही गोष्ट मान्य केली. त्यानंतर त्या दोघांनी लग्न केले.

लग्नानंतर राखी आणि गुलझारला मेघना गुलझार मुलगी झाली. मुलीच्या जन्मानंतर राखीला अभिनय क्षेत्रात परत येण्याची इच्छा होती. पण गुलझारने या गोष्टीची परवानगी दिली नाही. म्हणून या दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली.

दोघांमधले वाद दिवसेंदिवस वाढत होते. असे बोलले जाते की, एकदा भांडण सुरू असताना गुलझारने राखीवर हात उचलला होता. म्हणून या दोघांमधले वाद मोठ्या प्रमाणावर वाढले. त्या दिवशी राखीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

राखी आणि गुलझार यांनी घटस्फोट घेतला नाही. पण त्यांनी वेगळं राहण्यास सुरुवात केली. वेगळं रहायला लागल्यानंतर राखीने अभिनय क्षेत्रात परत येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अनेक चित्रपट साइन केले. त्या मुख्य अभिनेत्रीसोबतच अनेक प्रकारच्या भुमिका करत होत्या.

८० आणि ९० च्या चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भुमिका केल्यानंतर राखीने अभिनय क्षेत्रापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना लाईमलाईट नको हवी होती. म्हणून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. त्या आज आरामात आयुष्य जगत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

लग्नाला होकार देण्या अगोदर ट्विंकलने अक्षयसमोर ठेवली होती ‘ही’ अट

‘जंगल’ चित्रपटातील हिरोची आज झाली आहे ‘अशी’ अवस्था तुमचा विश्वास बसणार नाही

आमिर खानने दिव्या भारतीसोबत केलेल्या ‘त्या’ कृत्यामुळे घाबरलेली दिव्या तासंतास बाथरूममध्ये रडत बसली होती

एकेकाळी सचिन – शिल्पाच्या अफेअरच्या चर्चेने बाॅलीवूड व क्रिकेटजगतात धुरळा उडवला होता

७० आणि ८० च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा राजू आज असे आयुष्य जगतो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.