सध्या साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक अभिनेत्री खुप जास्त चर्चेत आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे रश्मीका मंदाना. रश्मीका सध्या नॅशनल क्रश ऑफ इंडिया म्हणून खुप प्रसिद्ध झाली आहे. रश्मीका साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
रश्मीकाने २०१६ मध्ये अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. आत्तापर्यंत तिने दहा चित्रपटांमध्ये काम केले आहे. खुप कमी वेळातच रश्मीका साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री बनली आहे. खुपच कमी वेळात रश्मीकाला हे यश मिळाले आहे.
रश्मीकाने विजय देवरकोंडासोबत गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी खुप जास्त पसंत केले आहे. आज रश्मीका साऊथ टॉपची आणि सर्वात महागडी अभिनेत्री आहे.
रश्मीकाचा जन्म ५ एप्रिल १९९६ मध्ये कर्नाटकच्या कोंडामध्ये झाला होता. रश्मीकाची आई गृहिणी आहे. तर वडील बिजनेस मॅन आहेत. रश्मीकाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. रश्मीका मंदानाने डिग्रीचे शिक्षण पुर्ण केले आहे.
ती श्रीदेवीची खुप मोठी फॅन आहे. श्रीदेवीला बघूनच रश्मीकाने अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. कॉलेजमध्ये असताना रश्मीकाने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. २०१४ मध्ये तिने एका स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेची ती विजेता झाली.
२०१५ मध्ये तिने परत एकदा एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि त्याची विजेता झाली. या स्पर्धेचे फोटो वर्तमान पत्रात छापून आले. ते फोटो बघून त्यावेळी कर्नाटकचे प्रसिद्ध दिग्दर्शक रिषभ शेट्टीने तिला चित्रपटाची ऑफर दिली.
२०१६ मध्ये ‘किराक पार्टी’ चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. रश्मीका रातोरात कर्नाटकची सुपरस्टार झाली होती. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. तिला पहिल्या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
त्यानंतर तिने अंजना पुत्रम आणि चमक चित्रपटांमध्ये काम केले. हे चित्रपट देखील सुपरहिट झाले होते. ह्या तीन चित्रपटांमूळेच ती कर्नाटकची टॉपची अभिनेत्री झाली होती. त्यानंतर तिने ‘चलो’ या चित्रपटातून तेलगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यु केला.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला होता. त्यानंतर २०१८ मध्ये तिचा ‘गीता गोविंदम’ चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने तिला साऊथच नाही तर सगळ्या भारतात प्रसिद्ध केले. हा चित्रपट सुपरहिट झाला.
या चित्रपटासोबतच ती तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील देखील टॉपची अभिनेत्री झाली होती. तिने तेलुगू आणि कन्नडमध्ये एकूण दहा चित्रपट केले. फक्त दहा चित्रपटांमूळेच ती टॉपची अभिनेत्री झाली होती. सगळ्या भारतात ती प्रसिद्ध झाली.
रश्मीकाने २०१७ मध्ये रकशित शेट्टीसोबत साखरपुडा केला होता. पण २०१८ मध्ये हे दोघे वेगळे झाले. रश्मीका सध्या तिच्या करिअरवर लक्ष देत आहे. तिने काही चित्रपटांमधूनच खुप जास्त प्रसिद्धी मिळवली आहे. ती आत्ता साऊथच्या मोठ्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जाणून घ्या ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिकेतील सुमन नक्की कोण आहे?
अमिताभ बच्चनने केली त्यांच्या २८०० कोटी रुपयांच्या संपत्तीच्या वारसदाराची घोषणा
‘शोले’ चित्रपटातील जेलर सायकलच्या दुकानात करत होते काम; एका नाटकाने बदलले आयुष्य
आमिषा पटेलचे करिअर खराब करण्यासाठी करीना कपूरने केले होते ‘हे’ काम