जाणून घ्या, देशातील पाच भितीदायक रेल्वे स्टेशनबद्दल आणि त्यांच्या संबंधित असलेल्या घटनांबद्दल

भारतात अशी काही ठिकाणे आहे. जिथे जायला लोकं घाबरत असतात, तसेच त्या ठिकाणी जाण्याचा विचारही लोक लवकर करत नाही. आज अशाच पाच रेल्वे स्टेशनबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

नैनी जंक्शन- उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये हे नैनी जंक्शन नावाचे स्टेशन आहे. या स्टेशनला भुतिया स्टेशन पण म्हटले जाते. या ठिकाणी असलेल्या जेलमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेल्या क्रांतिकाऱ्यांना ठेवण्यात आले होते. त्यांना याठिकाणी खुप यात्ना सहन कराव्या लागल्या होत्या. त्यामध्ये अनेकांचे मृत्यु झाले होते, त्यामुळे या ठिकाणी नेहमीच भितीचे वातावरण असते.

मुलुंड- महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये असलेल्या मुलुंड स्टेशनलाही देशातील काही भितीदायक स्टेशनमध्ये मोजले जाते. या ठिकाणी येण्याचा विचार करुनही अनेक जणांचा थरकाप उडतो. इथे आलेल्या काही प्रवाशांनी काही भयानक आवाज ऐकल्याच्या तक्रारही केल्या होत्या.

चित्तुर- भितीदायक रेल्वे स्टेशनच्या यादीमध्ये आंध्रप्रदेशच्या चित्तुर रेल्वे स्टेशनचे नाव पण येते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी एक सीआरपीएफचा जवान उतारला होता. पण त्याला आरपीएफ आणि टीटीईने मारहाण केली होती. त्यामध्ये त्याचा मृत्यु झाला, त्यानंतर न्याय मिळावा यासाठी त्याची आत्मा भटकते.

बडोग रेल्वे स्टेशन- हिमाचल प्रदेशच्या सोलन जिल्ह्यामध्ये स्थित असणारे बडोग रेल्वे स्टेशन जितके सुंदर आहे, तितकेच भितीदायक पण आहे. या स्टेशनच्या बाजूला एक मोठी सुरंग आहे. त्याला बडोग सुरंग म्हटले जाते. या सुरंगची निर्मिती एक ब्रिटीश इंजिनिअर कर्नल बडोगने केला होता, त्यानंतर त्याने तिथे आत्महत्या केली होती.

बेगुनकोदर- प्रत्येक भितीदायक स्टेशन मागे एक गोष्ट लपलेली असते, तशीच काहीशी गोष्टी पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्याच्या बेगुनकोदर स्टेशनची आहे. इथे काही लोकांनी सफेद साडीमध्ये एका भुताला पाहिल्यादा दावा केला गेला होता. त्यानंतर ४२ वर्षे या स्टेशनला बंद ठेवण्यात आले होते. मात्र २००९ मध्ये या स्टेशनला पुन्हा सुरु करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

नाबालिक मुलीसोबत लग्न करत होता साऊथचा ‘हा’ सुपरस्टार; पोलीसांनी थांबवले लग्न
अरे वा! कोरोना लस घेतल्यानंतर केंद्र सरकार देतंय ५ हजार रुपये, जाणून घ्या प्रक्रिया
‘तेव्हा मला ड्रायव्हरसमोर जायलाही लाज वाटायची’; व्हायरल क्लिपवर राधिकाने सांगितला अनुभव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.