Share

‘Indian Idol Marathi’ला मिळाले टॉप 5 स्पर्धक, ‘या’ दिवशी होणार विजेतेपदासाठी लढत, प्रेक्षक उत्सुक

Indian Idol Marathi

‘इंडियन आयडल मराठी’ (Indian Idol Marathi) या शोने अल्पावधीतच महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवली. या शोमधील प्रत्येक स्पर्धकाने आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. तर आता हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. शो अंतिम टप्प्यात पोहोचला असून यामधील टॉप ५ स्पर्धकांची नावे जाहिर झाली आहेत.

‘इंडियन आयडल मराठी’ (Indian Idol Marathi) या शोची सुरुवात नोव्हेंबर २०२१ पासून झाली. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून २४ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. तर यामध्ये १४ स्पर्धकांनी आपले स्थान निश्चित केले होते. तेव्हापासून या १४ स्पर्धकांनी आपल्या आवाजाने परिक्षक आणि प्रेक्षकांचे मन जिंकून घेण्याचा प्रयत्न केला.

सुरांचा हा प्रवास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून शोला आता टॉप ५ स्पर्धक मिळाले आहेत. जगदीश चव्हाण, भाग्यश्री टिकले, प्रतीक सोळसे, श्वेता दांडेकर आणि सागर म्हात्रे हे ‘इंडियन आयडल मराठी’चे टॉप ५ स्पर्धक आहेत. तर जगदीश चव्हाणला टॉप ५ मधील पहिला स्पर्धक होण्याचा मान मिळाला आहे.

‘इंडियन आयडल मराठी’च्या (Indian Idol Marathi) या स्पर्धेत कोण बाजी मारणार? हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. सोमवार ते बुधवार म्हणजेच १८ ते २० एप्रिल दरम्यान ‘इंडियन आयडल मराठी’चा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. टॉप ५ स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत रंगताना पाहायला मिळणार आहे. तर शोचा किताब कोण जिंकणार? आणि इंडियन आयडल मराठीच्या पहिल्या सीझनचा विजेता कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, ‘इंडियन आयडल’ (Indian Idol Marathi) हा शो पहिल्यांदाच प्रादेशिक भाषांमधून होत आहे. या शोमध्ये प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल हे परिक्षक म्हणून आपली भूमिका बजावत आहेत. तसेच शोदरम्यान संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या मंचावर आपली उपस्थिती दर्शवली होती. तर आता अंतिम सोहळ्यासाठी कोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार हे लवकरच कळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
ड्रग्स घेऊन मला कुल वाटायचं, मग मी बिनधास्तपणे मुलींसोबत.., संजय दत्तचा मोठा खुलासा
रणबीर कपूरला लग्नात सासूकडून मिळाले तब्बल एवढ्या कोटींचे गिफ्ट, किंमत वाचून डोळे होतील पांढरे
KGF चे खरे किंग आहे प्रशांत नील, फक्त 3 चित्रपट केले आणि तिन्ही ब्लॉकबस्टर, अशी आहे पर्सनल लाइफ

मनोरंजन ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now