अमेरिकन टॉम अल्टरचा जन्म झाला होता भारतात; चित्रपटांमध्ये विदेशी खलनायक बनून अभिनेत्यांना दिला त्रास

भारतीय नसूनही बॉलीवूडमध्ये चांगले काम करणारे अनेक कलाकार आहेत. अशाच एका कलाकाराबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. या अभिनेत्याचे नाव आहे टॉम अल्टर. चेहऱ्याने विदेशी दिसणारे टॉम भारतात जन्मले होते. खुप कमी लोकांना या गोष्टीबद्दल माहीती आहे.

टॉम अल्टर आज आपल्यामध्ये नाहीत. पण बॉलीवूडच्या विदेशी कलाकारांमध्ये त्यांचे नाव सर्वात पहीले घेतले जाते. दिसायला विदेशा असणारे पुर्णपणे देसी होते. त्यांचा जन्मही भारतात झाला होता. २२ जुन १९५५ ला जन्मलेल्या टॉमचे खरे नाव थॉमस बीच अल्टर होते.

अनेक वर्षांपासून टॉमचे कुटूंब भारतात राहत होते. त्यामूळे त्यांचा जन्मही भारतात झाला. भारताच्या मसूरीमध्ये टॉमचे कुटूंब राहत होते. तिथेच टॉमचा जन्म झाला होता. टॉमने मसूरीतील एका शाळेतून त्यांचे शिक्षण पुर्ण केले होते.

पुढील शिक्षणासाठी टॉमला त्यांच्या कुटूंबाने लंडनला पाठवले होते. पण अभ्यासात जास्त मन लागत नसल्यामूळे टॉम वर्षाच्या आतच भारतात परत आले. परत आल्यानंतर त्यांनी शाळेत शिकवायला सुरुवात केली होती. अनेक दिवस शिक्षकाचे काम केल्यानंतर त्यांना बोर होत होते.

तरुण वयात टॉमला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हेच कळत नव्हते. शिकवून मन भरल्यानंतर टॉमने अमेरिकेच्या एका हॉस्पिटलमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. पण तिथेही त्यांचे मन जास्त दिवस लागले नाही. त्यांनी परत एकदा भारतात जाण्याचा निर्णय घेतला.

असे बोलले जाते की, राजेश खन्नामूळे टॉम अभिनय क्षेत्रात आले होते. त्यांचा आराधना चित्रपट पाहील्यानंतर टॉमला अभिनेता बनण्याची इच्छा निर्माण झाली. त्यानंतर टॉमने एनएसडीमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजच्या दिवसांमध्ये नसीररुद्दीन शहा आणि ओम पुरी टॉमसोबत शिकत होते.

टॉम अल्टर भलेही विदेशी दिसत असले तरी त्यांची हिंदी आणि उर्दू मात्र अप्रतिम होती. याच कारणामूळे त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळाले. धर्मेंद्र आणि हेमा मालिनीसोबत ‘चरस’ चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. पहील्या चित्रपटानंतर टॉमला बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या.

परवरीश, राम भरोसे, कुदरत, गांधी, विधाता, शर्त, वीर झारासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. टॉम अल्टरने ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटांसोबतच टॉम टेलिव्हिजनवर देखील मोठ्या प्रमाणावर सक्रिय होते. अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केले.

जुनून, भारत एक खोज, अभिमान आणि रिश्तो का चक्रव्यूही अशा मालिकांमध्ये काम केले. टॉमने त्यांची लहानपणाची मैत्रीणीसोबत लग्न केले होते. टॉमला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. बॉलीवूडमध्ये चांगले नाव कमवणाऱ्या टॉमला इंडस्ट्रीतील काही प्रसिद्ध खलनायकांपैकी एक आहेत.

टॉम गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरचा सामना करत होते. कॅन्सरमूळे २०१७ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यावेळी टॉम रिश्तों का चक्रव्यूह मालिकेत काम करत होते. त्यांच्या मृत्यूने सगळ्यांना धक्का बसला होता. आजही टॉम त्यांच्या भुमिकेच्या माध्यमातून लोकांच्या मनात जिवंत आहेत.

महत्वाच्या बातम्या –
स्मिता पाटीलच्या मृत्यूनंतर तुटलेले राज बब्बर रेखाच्या प्रेमात झाले होते पागल
सुमोना चक्रवर्ती कपिल शर्माला घालायाची शिव्या; म्हणाली, पैशांसाठी सगळं सहन करत होते
संजय दत्तच्या या गर्लफ्रेंडला वैतागले होते सुनील दत्त; ब्रेकअप करण्याचे दिले आदेश
बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी रिमा लागूने सोडली होती बॅंकेतील नोकरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.