टॉलिवूड अभिनेता साई धरम तेजचा भीषण अपघात; अपघातात गंभीर जखमी

हैदराबाद। साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता साई धरम तेज शुक्रवारी एका रस्ता अपघातात जखमी झाला आहे. साई धरम तेज स्पोर्ट्स बाईकवरून रायदुर्गम केबल पुलावरून आयकियाकडे जात होता, तेव्हा अचानक बाईकवरून घसरुन खाली पडल्यानं अपघात झाला व गंभीर जखमी झाला आहे.

सध्या तो बेशुद्ध असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार साई धरम तेज सध्या व्हेंटिलेटरवर आहे. अपघातावेळी तेज हा अतिवेगाने बाईक चालवत होता. व गाडीवरून नियंत्रण सुटलं व घसरून त्याचा अपघात झाला. साई धरम तेजला बेशुद्ध अवस्थेत मेडिकओव्हर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, त्याच्या डोळ्याजवळ, छातीवर आणि पोटाजवळ जखमा झाल्या, पण तो आता धोक्याबाहेर आहे. मिळालेल्या माहितीनुसार साई धरम तेज त्याच्या 18 लाखांच्या 1160 सीसी स्पोर्ट्स बाईकवर रायदुर्गम केबल पुलावरून आयकियाकडे जात होता, तेव्हा अचानक घसरुन खाली पडल्यानं जखमी झाला आहे.

दरम्यान अभिनेत्याने हेल्मेट घातल होतं त्यामुळे त्याच्या डोक्याला इजा झाली नाही. मात्र इतरत्र त्याला इजा झाल्या आहेत. साईला पुढील 48 तास व्हेंटिलेटरवर निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, तसेच तो लवकरच बरा होईल असे सांगण्यात आलं आहे. साईचा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला असून एका युजरने ट्विटरवर पोस्ट केला आहे.

साई धमर तेजच्या टीमने सांगितल की, ‘साई आता ठीक आहे आणि तो रिकवर होतआहे. काळजीचं कारण नाही. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अभिनेता पवन कल्याण, चिरंजीवी आणि कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली आहे.

माध्यमांशी बोलताना पवन कल्याण यांनी सांगितले, की तेजला अपोलो रुग्णालयात हलवले जाईल. त्यामुळे आता चाहते साईला लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर त्याचा अपघाताचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात पाहिलं जाऊ शकतं की साई धरम तेज ला शरिरावर डोळे, छाती, कंबर तसेच इतरत्र जखमा दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
तालिबान्यांचं राक्षसी कृत्य! माजी उपराष्ट्रपती सालेह यांच्या भावाची केली निर्घृण हत्या; आधी गळा कापला, मग घातल्या गोळ्या 
मोठी बातमी! आता Whatasapp वरून पैसे ट्रान्सफर करता येणार, जाणून घ्या कसे… 
भाजप सरकारमुळेच लक्ष्मी, दुर्गा आणि सरस्वतींची शक्ती कमी झाली – राहूल गांधी 
विराट कोहलीकडून कर्णधारपद काढून घेणार? रोहीतसह ‘ही’ नावेही नव्या कर्णधारासाठी शर्यतीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.