Share

“जम्मू-काश्मीरमधील आजची परिस्थिती ही १९९० पेक्षाही भयानक”, स्थानिकांनी सांगितला धक्कादायक अनुभव

जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून टार्गेट किलिंगच्या घटना घडत आहेत. दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांची हत्या केली जात आहे. या घटनांमुळे काश्मिरी पंडित आणि तर हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भयभीत झालेल्या काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून पलायन करण्याची घोषणा केली आहे. (“Today’s situation in Jammu and Kashmir is worse than 1990”, says local people)

आज मोठ्या संख्येने काश्मिरी पंडित स्थलांतर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये १९९० साली ज्याप्रमाणे घटना घडत होत्या, तशाच घटना आता पुन्हा घडत आहेत, असे पलायन करणाऱ्या काश्मिरी पंडितांनी सांगितले आहे. सरकारकडे सुरक्षा पुरविण्याची मागणी करत काश्मिरी पंडितांनी जम्मूत निदर्शने देखील केली आहेत.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सातत्यानं काश्मिरी पंडितांना लक्ष्य केलं जात आहे. गेल्या एका महिन्यात दशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काल दहशतवाद्यांनी एका हिंदू बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर दहशतवाद्यांनी एका मजुराची देखील हत्या केली होती.

या घटनांमुळे हिंदू भयभीत झाले आहेत आणि त्यांनी सामूहिक पलायन करण्याची घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीर खोऱ्यातून पलायन करणाऱ्या अजय नावाच्या व्यक्तीने सांगितले की, “आजची काश्मीरमधील परिस्थिती ही १९९० पेक्षाही भयानक आहे. आम्हाला आमच्याच कॉलनीमध्ये का डांबून ठेवण्यात आलं आहे? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. हे सर्व प्रशासनाचं अपयश आहे.”

https://twitter.com/ANI/status/1532538034465361920?t=qOqjhLYL6mWlcuVd99xo5g&s=08

तसेच श्रीनगरमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी अमित कौल म्हणाले की, “कालच या ठिकाणी चार जणांची हत्या करण्यात आली आहे. ४० कुटुंबे शहर सोडून गेली आहेत. आम्हाला सुरक्षा पुरविली जात नाही. आम्ही सरकारकडे सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे”, असे अमित कौल यांनी सांगितले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हत्यांमुळे इतर राज्यांतून कामासाठी आलेले मजूर देखील घाबरले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1532463321953488896?t=XsWp6MD4il8nmzWrBAjNwQ&s=08

गेल्या २६ दिवसांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी १० जणांची हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील रिस्थितीवर चर्चा करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा आज महत्त्वाची बैठक घेणार आहेत. बँक व्यवस्थापक विजय कुमार यांची हत्या झाल्यानंतर काश्मिरी पंडितांनी देखील आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

महत्वाच्या बातम्या :-
नालंदातील ‘या’ गावात हिंदू लोक पढतात दिवसातून 5 वेळा अजान, कारण वाचून आश्चर्य वाटेल
काश्मीरमधील हिंदूंना सरकारने बंदुकांचे चालवण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे; मनसेची सरकारकडे मागणी
२४% व्याजाने पैसे देणाऱ्या LIC किंगच्या घरावर छापा, कोट्यावधींच्या घबाडासह १०० तोळे सोने जप्त

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now