‘आजची काँग्रेस म्हणजे नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी’, शरद पवार यांचे खडे बोल

मुंबई। रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय.” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला डिवचलं आहे.

एका न्यूजपोर्टलशी बोलताना काँग्रेसच्या नेतेमंडळीमध्ये अजून अहंकाराची भावना आहे का? असा प्रश्न पवारांना विचारला असता या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी काँग्रेसच्या अवस्थेवर भाष्य करत टीका केली आहे. इंडिया टुडे ग्रुपचं मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या ‘मुंबई तक’च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पवारांची दीर्घ मुलाखत घेण्यात आली.

या मुलाखतीत पवारांनी उदाहरण देत सांगितलं की, मागे मी एक गोष्ट सांगितली होती. उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे.

पण त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनीची आता १५-२० एकरवर आलीय. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही.” तशीच सध्या कॉँग्रेसची अवस्था झाली आहे.असं पवार म्हणाले.

पवार म्हणाले, काँग्रेसची आज दूरवस्था झाली आहे. असे असले तरी हा आजही रिलेवन्स असलेला पक्ष आहे. देशभर पसरलेला पक्ष आहे. काँग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात संख्याबळ असल्यामुळेच युपीएसारखा प्रयोग झाला. पण आज काँग्रेसकडे केवळ चाळीसच जागा आहेत. एकेकाळी काँग्रेस काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत होती. पण ती होती. आहे नाही. होती हे मान्य केलं पाहिजे.

मग (विरोधी पक्ष) जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होईल.” काँग्रेची नेतेमंडळी राहुल गांधी हे विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ शकतात, असं सांगतात. यावर भाष्य करताना पवार यांनी, “काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात.” असं पवारांनी बोलून दाखवलं आहे.

दिल्लीच्या वर्तुळात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत, अशी चर्चाही सुरू आहे. याबद्दलच पवार म्हणाले, मला प्रशांत किशोरची मदत घ्यायची कोणतीच गरज नाही. तसंच सध्या मला सत्तेत बसण्याचीही कुठली महत्त्वाकांक्षा नाही.

पण विरोधी पक्षांमध्ये समन्वयाचं राजकारण घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करेल, अशा शब्दांत पवारांनी आपली भविष्यातली राजकीय मोर्चेबांधणी कशी असेल हे सांगितलं आहे.
मराठी बातम्या
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या इको कारला भीषण अपघात; १० जण गंभीर जखमी 
बॉलीवूड दुःखात! अक्षय कुमारच्या आईच्या निधनानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या आईचेही निधन
पुणे पोलिसांची राणे कुटुंबाविरोधात मोठी कारवाई; कुठे जाणार, कुठून आले? यावर पोलिस ठेवणार नजर, जाणून घ्या प्रकरण
इंडीयन आर्मीसाठी टाटा बनवणार लढाऊ विमाने; अखेर सरकारने टाटांवरच विश्वास टाकला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.