आज राज्यात कोरोनाचे ५ हजार ५३६ नवीन रुग्ण; सगळी मिळून आकडेवारी २ लाखाच्या उंबरठ्यावर

मुंबई | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या २ लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

आज राज्यात ५ हजार ५३६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १९८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आजची आकडेवारी धरून १ लाख ८० हजार २९८ झाली आहे.

राज्यात १९८ लोकांनी जीव गमावला असून त्यातील ६९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर उरलेले १२९ मृत्यू हे मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्युदर ४.४७ टक्के आहे.

आज २२४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही आकडेवारी धरून आजपर्यंत राज्यात ९३ हजार १५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) ५१.६७% इतका आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.