सोनं खरेदीची सुवर्णसंधी! गेल्या महिन्याच्या तुलनेत ५ हजार रुपयांनी स्वस्त सोनं, जाणून घ्या

मुंबई | सोनं किंवा चांदी खरेदी करणाऱ्यासांठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर्सच्या किंमतीत वाढ झाल्याने सोन्याच्या दरमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. राज्याच्या मुंबई आणि पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये सोन्याच्या दरात १६०० रुपयांची घसरण आणि चांदीच्या दरात ७०० रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.

मल्टी कमोडिची एक्सचेंजवर आधीच्या सत्रात सोन्या-चांदीच्या भावात किरकोळ वाढ पहायला मिळाली होती. मात्र आता सोन्याचे भाव स्थीर असल्याचे दिसत आहे. मुंबई आणि पुण्यात १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ४३,७६० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४४,७६० इतका आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपुर्वी सोन्याच्या भावात एक हजार रुपयांची वाढ झाली होती. यानंतर आता लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात एक फेब्रुवारीला सोन्याचा भाव ४९,४५० इतका होता. त्यामुळे या चार ते पाच दिवसांत सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी असल्याचे बोलले जात आहे.

कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या आर्थिक व्यवहारावर मोठ्या मर्यादा आल्या आहेत. दरम्यान सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा फरक पडत आहे. याशिवाय इंडियन बुलियन ज्वलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातो. तसेच एमसीएक्स हे देशातील सर्वात मोठे कमेडिटी मार्केट असून याठिकाणी सोन्याचा भाव आणि आयात कराचा विचार केला जातो.

भारतीय वायदे बाजारात सोन्याचा दर ४५,६०० या पातळीवर पोहचल्यानंतर ते वेगाने वाढण्याची शक्यता असल्याचे मत विश्लेषक मांडत आहेत. आता भारतात सोन्याचे दर ४५ हजारांच्या खाली आहेत. त्यामुळे सध्या सोन्याची खरेदी वाढली असल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-
फोन टॅपिंग प्रकरण विरोधकांवरच उलटले! सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल; देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीची शक्यता
मी बांग्लादेशच्या स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी होतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी
परमबीरसिंगांच्या संपत्तीची राष्ट्रवादीकडून पोलखोल; मुंबई, हरियाणात कोट्यावधींची मालमत्ता

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.