अदानी ग्रूपच्या कंपन्यांसाठी आजचा काळा दिवस, NSDL च्या कारवाईचे शेअर बाजारात उमटले पडसाद

राष्ट्रीय शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेकडून (NSDL) नुकतीच तीन परदेशी गुंतवणूकदारांवर कारवाई केली. NSDL ने सील केलेली या तीन फंडांच्या अकाऊंटसमधून अदानी ग्रूपच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली होती.

त्यामुळे अदानी ग्रुप ऑफ कंपनीजच्या शेअरहोल्डरसाठी आजचा दिवस वाईट म्हणून उगवला. कारण अदानी ग्रुप ऑफ कंपनीच्या सहा लिस्टेड कंपन्यांपैकी साही कंपन्यांचे शेअर्स आज मजबूत कोसळून थेट लोअर सर्किटला लागलेले पाहायला मिळाले.

मात्र, त्यांची खातीच एनएसडीएलने सील केल्यानं याचे पडसाद शेअर मार्केटमध्ये दिसून आले. अदानी ग्रुपच्या कंपन्याचे शेअरचे भाव कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, ७ जून २०२१ रोजी अदानी इंटरप्राइझेस या कंपनीने आतापर्यंतच्या १७१७.१२ या उच्चांकी किमतीला गवसणी घातली होती. त्यानंतर शेअर सलग कोसळताना पाहायला मिळाला.

आज अदानी इंटरप्राइझेसचा शेअर कोसळून थेट १२०१ रुपयांपर्यंत खाली आलेला पाहायला मिळाला. म्हणजेच शेअरमध्ये तब्बल ४०० ते ५०० रुपयांची मंदी झालेली पाहायला मिळाली. NDSL ने केलेल्या कारवाईत जी अकाउंट्स गोठवली गेली आहेत त्यांच्याकडे अदानी ग्रुप ऑफ कंपनीजचे तब्बल ४३ हजार ५०० शेअर्स आहेत.

यामध्ये अदानी इंटरप्राइझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन या कंपन्यांचा समावेश आहे. अलबुला इन्व्हेस्टमेंट फंडस्, क्रेस्ट फंड्स आणि APMS इन्व्हेस्टमेंट फंडस् या तिघांची खाती NSDL ने गोठवली असून त्याबाबतची माहिती NSDL च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

खाती गोठवली म्हणजेच आता या कंपंनीचे कोणतेही शेअर्स हे तीनही फंडस् हाऊसेस विकत घेऊ शकत नाही किंवा विकूही शकत नाहीत. मात्र कारवाई करण्याचे नेमकं कारण काय होत पाहुयात.

Albula इनवेस्टमेंट फंड, Cresta फंड और APMS इनवेस्टमेंट फंड यांच्याकडून मालकी हक्कांविषयी पुरेशी माहिती न देण्यात आल्यामुळे NSDLकडून त्यांच्यावर कारवाई केल्याचे सांगण्यात येते. खाती फ्रीज झाल्यामुळे आता या तिन्ही फंडसना समभाग खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार नाहीत.

बेहिशेबी मालमत्ता प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) या तिन्ही फंडसकडून पुरेशी माहिती देण्यात आली नव्हती. यासाठी नोटीसही पाठवण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतेही स्पष्टीकरण न आल्याने NSDLकडून ही खाती फ्रीज करण्यात आली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.