Homeताज्या बातम्याउधार कोणाला द्यावे? उधार दिलेले पैसे परत कसे मिळवायचे? जाणून घ्या सोपे...

उधार कोणाला द्यावे? उधार दिलेले पैसे परत कसे मिळवायचे? जाणून घ्या सोपे उपाय

आपल्यासोबत किंवा अनेक लोकांसोबत असं अनेकवेळा घडतं की जेव्हा आपण एखाद्याला पैसै उधार देतो ते परत करत नाहीत किंवा पैसै मागितल्यावर टाळाटाळ करतात. आपण अनेकवेळा सहानुभूती म्हणून मित्रांना किंवा नातेवाईकांना उधारीवर पैसे देत असतो पण आपले हक्काचे पैसे अनेकवेळा आपल्याला परत मिळत नाहीत.

अशावेळी आपल्याला भरपूर त्रास होतो. यामुळे आपल्यासोबत आपल्या पुर्ण कुटुंबालाही मानसिक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास जर तुम्हाला सहन करायचा नसेल तर पैसे उधारीवर देण्याच्या आधी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला त्याच काही गोष्टी सांगणार आहोत.

पहिली गोष्टी तर तुम्ही ज्या माणसाशी आर्थिक व्यवहार करणार आहात त्या माणसाची पार्श्वभूमी ओळखायला शिका. ज्या व्यक्तीला तुम्ही पैसै देणार आहात त्याबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला माहिती असली पाहिजे. जसे की त्याचा स्वभाव, समाजातील ओळख इ. गोष्टी.

जर तुम्ही एखाद्या माणसाला चांगले ओळखत असाल तर त्याला सुरूवातीला थोडेच पैसै द्या. समजा त्याने तुम्हाला १० हजार रुपये मागितले असतील तर त्याला ५ हजार द्या आणि त्या पैशांची परतफेड तो कशी करतो याचे निरीक्षण करा. त्यानंतर त्याच्यासोबत मोठे व्यवहार करा.

तसेच पैसे उसने देताना किंवा उधारीवर कोणतीही वस्तू देताना तुम्ही नियमावली तयार केली पाहिजे. म्हणजे पैसे किती दिवस उधार ठेवायचे? एक महिना की दोन महिने हे ठरवा. जर त्या वेळेत त्याने पैसे परत दिले नाही तर त्यावर दंड आकारा. दंड आकारल्याने कदाचित समोरचा वेळेवर पैसे परत करेल.

ज्या दिवशी मुदत संपेल त्या दिवशी कर्जदाराला फोन किंवा मेसेज करा. त्याला कळू द्या की तुम्हाला पैशांची किती गरज आहे. त्याला काय वाटेल, आपले संबंध खराब होतील, तो स्वता आणून देईल असा विचार जर तुम्ही करत बसला तर तुमचे पैसे कधीच परत मिळणार नाहीत.

न लाजता न घाबरता उधारी मागा कारण जर सुरूवातीला तुम्ही जर ढिले पडलात तर तुमचे पैसै गेले म्हणून समजा. काही माणसे फार चांगली असतात. कोणाचे पैसे बुडवू नये असे त्यांचे मत असते. पण कधीकधी अशा माणसावर मोठे आर्थिक संकट येऊ शकते. म्हणून कर्जदाराला एकदा त्याची अडचण विचारा.

जर तो खरं बोलत असेल तर त्याला एक संधी द्यायला हरकत नाही. तुमच्या परिसरात जे लोक हरामी आहेत म्हणजे उधारीवर पैसे दिल्यानंतर परत करत नाही अशा लोकांची एक यादी करा. अशा लोकांचा शोध घ्या आणि मित्रांना विचारून अशा लोकांची ब्लॅक लिस्ट तयार करा.

अशा लोकांना कधीच पैसे देऊ नका किंवा कसलाही व्यवहार त्यांच्यासोबत करू नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीने तुमचे पैसे बुडवले आहेत त्याला सोडू नका. त्याने कितीही माफी मागितली तरी त्याला सोडू नका कारण त्याने तो माणूसच नाही हे सिद्ध केले आहे.

तुमचे पैसे बुडवले त्याची सगळीकडे चर्चा करा. मित्रांना त्याच्याबद्दल सांगा. त्याच्या मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये चर्चा करा आणि कोठेही त्याला मान वर करून चालायची लाज वाटली पाहिजे अशी त्याची अवस्था करा. मग पाहा तुमचे पैसे तुमच्या घरी स्वताहून आणून देईल. पण हा पर्याय शक्यतो सगळ्यात शेवटी वापरा.

ह्या उपायामुळे तुमच्यावर संकट देखील ओढावले जाऊ शकते त्यामुळे सावध राहा. समाजात काही अशा एजन्सी असतात ज्या उधारी वसूल करून देतात. या कामासाठी त्यांना पैसे द्यावे लागतात. तुमचे पैसे वसुली करण्यासाठी तुमचे जास्त पैसे गेले तरी त्याला सोडू नका. कारण अशी माणसे निर्लज्ज असतात.

त्यांना कोणत्या गोष्टीचे काहीच वाटत नाही. वसुली एजन्सीवाले अशा माणसाला चांगला सरळ करतात आणि त्याच्याकडून पैसे वसूल करतात. हा सगळ्यात शेवटचा पर्याय आहे. जेव्हा उधारी थकवणाऱ्याला फटके पडतील तेव्हाच तो सरळ होईल. काहीजण असेच असतात त्यांना धडा शिकवणे गरजेचे असते.

महत्वाच्या बातम्या
कोरोना झाला तरी शिवसेनेचा वाघ लोकांसाठी झटतोय, एकनाथ शिंदेंनी थेट रुग्णालयातून घेतला परिस्थितीचा आढावा
टाटाने खेळला मोठा डाव! एकेकाळी ज्या गाडीने मार्केट गाजवलं ती कार आणणार इलेक्ट्रीक रूपात
‘या’ ५ शेअर्सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल, एका वर्षात दिला २८१% परतावा
एम्सची स्थापना नेहरूंनी नाही तर या व्यक्तीने केली होती; त्यासाठी स्वत:ची जमीनही विकली होती