Garba : नुकताच गणेशोत्सव पार पडला. गणेशोत्सवानंतर सर्वांनाच नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांची आतुरता लागलेली असते. येत्या २६ तारखेपासून नवरात्र सुरु होत आहे. त्यानिमित्ताने सगळीकडे गरब्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे.
मध्य प्रदेशातील हिंदू संघटनेने यावर्षी गरब्याच्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यात त्यांनी गरब्याच्या ठिकाणी बिगरहिंदूना प्रवेश करण्यास नाकारले आहे. अखंड राष्ट्रीय हिंदू सेनेचे अध्यक्ष आखाड्याचे महामंडलेश्वर अतुलेशानंद सरस्वती यांनी हा आदेश दिला आहे.
लव्ह जिहादचे प्रयत्न थांबवणे हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यभरातील प्रत्येक गरब्याच्या ठिकाणी अखंड राष्ट्रीय हिंदू सेनेचे दहा ते बारा कार्यकर्ते उपस्थित असतील असेही त्यांनी सांगितले. यात महिलादेखील असतील, असे ते म्हणाले.
नवरात्र उत्सवादरम्यान मध्य प्रदेशातील गरबा नृत्याच्या कार्यक्रमात बिगर हिंदू प्रवेश करणार नाहीत याची काळजी त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते घेतील. तसेच हे कार्यकर्ते गरब्याच्या ठिकाणी पुरुषांची ओळखपत्रे तपासतील आणि त्यांच्या कपाळावर कुंकू लावतील. त्यांनतर त्यांना प्रवेश देण्यात येईल असेही सेनेच्या अध्यक्षांनी सांगितले आहे.
पुढे ते म्हणाले की, देशभरात त्यांचे अडीच लाख कार्यकर्ते आहेत. त्यापैकी जवळपास ८५०० कार्यकते उज्जैनमध्ये आहेत. त्यांच्यापैकी महिलांची संख्या १५०० एवढी आहे. या सगळ्यांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच या सगळ्यांना गरबा मंडपात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मध्य प्रदेशातील सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, गरब्याचे स्थळ हे लव्ह जिहादचे माध्यम बनत आहेत. त्यामुळे आता या गरब्याच्या मंडपात तरुण-तरुणींना ओळखपत्राद्वारेच प्रवेश देण्यात यावा, असे त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
दाभोळकर हत्या तपासाबाबत कुटुंबीयांचे गंभीर आरोप, पोलिसांची पोलखोल करत केला ‘हा’ दावा
Adhalrav patil : भाजपची एक घोषणा अन् शिंदे गटातील माजी खासदार आढळरावांना फुटला घाम, वाचा नेमकं काय घडलं
“यापुढे फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजेत”, बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदेंची उडाली झोप
Madhya Pradesh : प्रेमापोटी मुस्लिम तरुणीने स्वीकारला हिंदू धर्म, कुटुंबियांकडून धोका असल्याचे सांगत पोलिसांकडे केली ‘ही’ मागणी