हेमामालिनीशी लग्न करायला परवानगी देताना धर्मेंद्रच्या पत्नीने टाकली होती ‘ही’ विचीत्र अट

असे बोलतात प्रेम हे आंधळे असते. त्यामूळे प्रेमात लोक काहीही करायला तयार असतात. तुमची जर लव्ह मॅरेज असेल तर मग अनेक वेळा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तुमच्या समोर लग्नासाठी अनेक अटी ठेवल्या जातात. अशाच एका अटीचा सामना बॉलीवूड अभिनेत्रीने केला आहे.

या अभिनेत्रीचे नाव आहे बॉलीवूडच्या ड्रीम गर्ल हेमा मालिनी. हेमा मालिनी यांनी अभिनेते धर्मेंद्रसोबत लग्न केले होते. बॉलीवूडच्या सर्वात सुंदर जोड्यांमध्ये या दोघांचे नाव येते. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची पहिली भेट चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

त्यानंतर १९७९ साली या दोघांनी शराफत आणि तुम हसी मै जवा या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यानंतर या दोघांमध्ये जवळीक वाढायला लागली. त्यांची मैत्री वाढत होती. या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

धर्मेंद्र आगोदरपासूनच विवाहीत होते. चित्रपटांमध्ये येण्या आगोदर धर्मेंद्र यांचा विवाह प्रकाश कौरसोबत झाला होता. या लग्नापासून धर्मेंद्रला मुले देखील होती. त्यामूळे धर्मेंद्र त्यांच्या पहिल्या पत्नीला सोडू शकत नव्हते. पण त्यांचे हेमा मालिनीवर खुप प्रेम होते.

त्यामूळे त्यांनी हेमा मालिनीशी धर्म बदलून विवाह केला होता. कारण हिंदू धर्मात एकाच लग्नाला मान्यता आहे. त्यामुळे त्यांनी हिंदू धर्म बदलून मुस्लिम धर्म स्वीकारून हेमा मालिनीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

१९७९ मध्ये हेमा मालिनी बरोबर त्यांचे लग्न दिलावर खान या नावाने झाले आहे. या दोघांच्या लग्नाला एवढे वर्ष पुर्ण झाली आहेत. तरी देखील त्यांचा संसार सुखाचा सुरु आहे. त्यांना दोन मुली देखील झाल्या.

या लग्नामुळे धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी खुप नाराज होत्या. त्यांना हे लग्न मान्य नव्हते. म्हणून त्या धर्मेंद्रवर खुप नाराज होत्या आणि घटस्फोट देण्यास नकार दिला होता. त्यांनी धर्मेंद्रसमोर एक अट ठेवली होती.

त्यांनी धर्मेंद्रला सांगितले होते की, ‘तुम्ही हेमा मालिनीसोबत लग्न करा. पण लग्नानंतर त्या कधीच आपल्या घरात म्हणजेच त्यांच्या सासरी येणार नाहीत’. धर्मेंद्र आणि हेमा दोघांनी ही अट मान्य केली. त्यामुळे हेमा मालिनी लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतरही त्यांच्या सासरी गेल्या नाहीत.

धर्मेंद्र यांचे वडील कृष्णासिंग देओल यांना हेमा आणि त्यांचे कुटुंब खुप आवडले होते. म्हणून ते या लग्नाने खुप आनंदी होते. ते अनेकदा हेमाच्या घरच्यांना भेटायला जायचे. त्यांच्याशी गप्पा मारायचे. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या घरात फक्त पाच मिनिटांचे अंतर आहे.

धर्मेंद्र यांच्या आईला देखील हे लग्न मान्य होते. त्या देखील नेहमी हेमा आणि त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी त्यांच्या घरी यायचे. पण हेमा मात्र कधीच त्यांच्या सासरी गेल्या नाहीत. हेमाच्या घरातील फक्त एकच व्यक्ती धर्मेंद्रच्या घरी गेली होती.

ती व्यक्ती होती हेमा मालिनीची मोठी मुलगी इशा देओल. धर्मेंद्र यांचे भाऊ अजितसिंग देओल म्हणजेच इशाचे काका खुप आजारी होते. इशा देओल आपली काकांची खुप जास्त लाडकी होती.

आपले लाडके काका आजारी आहेत. ही गोष्ट इशाला माहिती होती. तिला त्यांना भेटायची इच्छा होती. त्यामुळे तिने सनी देओलला फोन केला आणि घरी येण्याची परवानगी मागितली. सनीने तिला ती परवानगी दिली. त्यानंतर आपल्या काकांना भेटण्यासाठी इशा देओल तिच्या घरी गेली.

हे ही वाचा –

‘त्या’ घटनेनंतर पानाला चूना लावनारा भाऊ कदम अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनला

गर्लफ्रेंडपायी सलमानने सुनील शेट्टीची हात जोडून माफी मागितली होती; पहा काय होता किस्सा..

रवी किशनच्या मुलीसमोर ऐश्वर्या, दिपीका पडतील फिक्या, दिसायला आहे खुपच हॉट; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.