भर पत्रकारपरिषदेत खासदाराने ओढले महिला आमदाराचे गालगुच्चे, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या निवडणूकीमध्ये काही दिवस शिल्लक आहेत परंतु नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सात्यत्याने चालूच आहेत. त्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टीएमसी खासदार भरसभेत चक्क एका महिला आमदाराचे गालगुच्चे घेताना दिसत आहेत.

भाजपाने या गोष्टीचाच फायदा घेत भाजपाचे खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर तो व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एका महिला आमदाराचे गालगुच्चे टीएमसीचे खासदास कल्याण बॅनर्जी घेत आहेत. समोर पत्रकार परिषद चालु असताना सर्वांसमोर हा प्रकार घडला.

हा व्हिडीओ भाजपाचे खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी आता ट्विट केला आहे. परंतु हा व्हिडीओ केव्हाचा आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. परंतु भाजपाचे खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी आपल्या ट्विट मध्ये टीएमसीवर निशाणा साधला आहे. यात त्यांनी म्हंटले आहे की “टीएमसी महिलांचे सबलीकरण करत आहे, हे टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी व बंकुराच्या महिला आमदार आहेत व त्यांना तिकीट नाकारल्यामुळे नाराज आहेत. लाज वाटली पाहिजे’’, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

हा व्हिडीओ ट्विट केल्यावर भाजपाने टिएमसी वर निशाना साधला आहे. भाजपाने म्हंटले आहे की पश्चिम बंगालमध्ये महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार असे गुन्हे वारंवार घडत आहेत व त्यात अद्यापही घट झालेली नाही. पश्चिम बंगालमधील सरकारने राज्यातील महिलांवर होणाऱ्या गुन्ह्याची नोंद अजुनही एनसीआरबीला दिली नाही. त्याचा अहवालही बनविला नाही.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॉनर्जी यांनी महीलांना प्राधान्य दिले आहे. ५० महिलांना उमेदवारी दिली आहे. व ममता बॅनर्जी यांनी अलिकडेच रॅली काढली त्यातही प्रामुख्याने महिला सुरक्षा व महागाई हाच होता. शिवाय रॅलीमध्ये महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.