शेअर बाजारातील प्रत्येक शेअर चांगला परतावा देत नाही. काही शेअर खूप वर्षांनंतरही नकारात्मक परतावा देतात. त्यामुळे या शेअरमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते. पण या सगळ्यामध्ये असे अनेक शेअर्स असतात, जे गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात. असाच एक शेअर टायटन कंपनीचा आहे.(titan compay shear give huge profit to investor)
टायटन ही टाटा समूहाची एक कंपनी आहे. टायटन कंपनी ही टाटा समूह आणि तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळ (TIDCO) यांचा संयुक्त उपक्रम आहे. या कंपनीच्या शेअरने दोन दशकांत गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत.
टायटन कंपनीच्या शेअर्सनी मागील २० वर्षांत गुंतवणूकदारांना १,००,००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जा एखाद्या व्यक्तीने टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये २० वर्षांपूर्वी फक्त १० हजार रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर आता ती गुंतवणूक करणारी व्यक्ती करोडपती झाली असती.
८ मार्च २००२ रोजी टायटन कंपनीचा शेअर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर २.३५ रुपये होता. आता या शेअरची किंमत २,५५६ रुपये झाली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने ८ मार्च २००२ रोजी टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त १०,००० रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर आज त्या शेअर्सचे बाजारमूल्य १.०८ कोटी रुपये झाले असते.
जर तुम्ही या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर आज तुम्हाला १०.८ कोटी रुपये मिळाले असते. टायटन कंपनीच्या या शेअरने २० वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना सुमारे १,०८,६७५ टक्के परतावा दिला आहे. टाटा समूहाचा टायटन कंपनीमध्ये २५.०२ टक्के हिस्सा आहे.
टायटन कंपनीमध्ये तामिळनाडू सरकारची २७.८८ टक्के हिस्सेदारी आहे. भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची टायटन कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक आहे. सध्या टायटन कंपनीत राकेश झुनझुनवाला यांचा ५.०९ टक्के हिस्सा आहे. गेल्या एका वर्षात टायटन कंपनीच्या शेअरचा उच्चांक २,६८७ रुपये आहे. त्याचवेळी शेअरची नीचांकी पातळी १४०० रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या :-
भारतीय गुंतवणूकदार कमावणार बक्कळ नफा, ‘या’ नवीन सुविधेने अमेझॉन, टेस्ला यांचे शेअर्स विकत घेता येणार
शेन वॉर्नकडे असणाऱ्या खास बॉल विषयी तुम्हाला माहित आहे का? नसेल तर नक्की वाचा
झुंड चित्रपटाच्या प्रमोशनला अमिताभ बच्चन का दिसले नाहीत? चित्रपटाला होतंय नुकसान, चर्चांना उधाण