बायकोच्या त्रासाला कंटाळून पुरुषांनीच केले वडाचे पूजन, एकच बायको सात जन्मी नको म्हणून केली प्रार्थना

औरंगाबाद । सगळीकडे आज वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली जात आहे. महिलांसाठी हा दिवस विशेष असतो. महिला आपल्या पतीला चांगले आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतात. ‘हाच नवरा सातजन्मी मिळू दे’ म्हणूनही आज वडाची पूजा केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. यामध्ये कुठेही खंड पडला नाही.

आता मात्र ताच वटपौर्णिमेच्या दिवशीच औरंगाबादमध्ये काही पुरुष पिंपळाची पूजा करतात आणि चक्क मागणी करतात की, आयुष्यभर छळ करणारी तीच बायको नको, आम्हाला अविहाहीत ठेवा, असे साकडे त्यांनी घातले आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. औरंगाबादमध्ये पत्नी पीडित पुरुष संघटना आहे.

महिलांपासून खोट्या केसेसमध्ये अडकलेले आहेत अश्या पुरुषांना ही संघटना पाठबळ देते. त्यांची मदत करते. यामुळे संघटनेचे सदस्य पुरुष पिंपळाला फेऱ्या मारतात. तेही वटसावित्रीच्या एक दिवस आधी. हे पुरुष वडाला नाही तर पिंपळाला दोरा धरून फेऱ्या मारत आहेत.

विशेष म्हणजे या फेऱ्याही उलट्या असतात. त्याची मागणी महिलांच्या मागणीपेक्षा उलटी आहे. आहे तीच पत्नी मला पुढच्या जन्मी नको, त्यापेक्षा आम्हाला अविवाहित ठेव अशी याचना ती करत आहेत. यामुळे त्यांची चर्चा सुरू आहे. त्यांचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.

महिलांची मागणी पूर्ण होउ नये यासाठी हे पुरुष वटसावित्रीच्या एक दिवसाआधी पिंपळाला उलट्या फेऱ्या मारून महिलांची मागणी पूर्ण होऊ नये, अशी प्रार्थना करतात. यामुळे त्यांची ही प्रार्थना पूर्ण होणार का? की महिलांची प्रार्थना पूर्ण होणार हे यमराजलाच माहीत.

काही प्रमाणावर महिला आपल्या पतीला छळतात. खोट्या केसेस करतात, जेलमध्ये पाठवतात आणि कायदाही महिलांची जास्त बाजू घेतो. छळलेला पती परत सात जन्मी मिळावा अशी मागणी करतात, असे पत्नी पीडित पुरुष संघटनेचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्या

जगातील सर्वात स्वस्त फोन गणेश चतुर्थीला येणार, मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा

कुत्र्याची चेष्टा करणं तरुणाला भोवलं, अतिहुशार मुलाचा कुत्र्याने चावला हात, व्हिडीओ व्हायरल

कॅन्सरग्रस्त नट्टू काकांनी व्यक्त केली त्यांची शेवटची इच्छा, वाचून तुमच्याही येईल डोळ्यात पाणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.