तीरानंतर पुण्याच्या युवानलाही १६ कोटींच्या इंजेक्शनची गरज, आई-वडिलांची मदतीची हाक

पुणे | पुण्यातील अवघ्या १३ महिन्याचा चिमुकला युवानला स्पायनल मस्कुलर एट्रॉफी टाईप १ हा दुर्मिळ आजार झाला आहे. या आजारावर उपचार म्हणून अमेरिकेतील तब्बल १६ कोटी रुपयांच्या इंजेक्शनची गरज आहे. यासाठी या चिमुकल्याची आई रुपाली आणि वडिल अमित रामटेककर यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

सर्वसाधारण अशी आर्थिक परिस्थिती असणाऱ्या रामटेककर कुटुंबाला १६ कोटी ऐवढी मोठी रक्कम जमवणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी क्राउडफंडिगच्या मार्गाने पैसे जमवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आर्थिक मदतीचा हात देण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.

बाळाच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत मदत मागितली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच मदतीसाठी पुढे येत असतात. आता माझ्या बाळालादेखील त्यांनी मदत करावी. माझं बाळ इतर मुलांप्रमाणे ठणठणीत झालं पाहिजे. मोदी माझ्या बाळाला वाचवा”. अशी साद घातली आहे.

रुपाली आणि अमित रामटेककर यांनी एका वृत्तपत्राशी याबाबत संवाद साधताना माहिती दिली आहे की, युवानचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी तो मान धरत नव्हता. दुध गिळणं यासह अनेक त्रास होऊ लागले. त्यामुळे आम्ही त्याला दवाखान्यात नेलं.

दवाखान्यात तपासण्या केल्यानंतर बाळाला स्पायनल मस्कुलर एट्रॉफी हा एक दुर्मिळ आजार झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान युवानला या आजारातून बरं करण्यासाठी बाहेरच्या देशातून इंजेक्शन आणावे लागेल. हा एकच उपाय डॉक्टरांनी सांगितला.

यासाठी गरजेचं असणाऱ्या इंजेक्शनाची किंमत जवळपास १६ कोटी रुपये आहे. इतकी मोठी रक्कम जमा करण्यासाठी आम्ही क्राउडफंडिंग हा मार्ग अवलंबला असून जवळपास २५ दिवसांमध्ये २३ लाख रुपये जमा झाले आहेत.

दरम्यान, यासाठी समाजात अनेक दानशूर लोक आहेत. त्यांनी पुढे यावं आणि मदतीचा हात पुढे करावा. राजकीय नेते, सेलिब्रिटी, खेळाडू आणि उद्योगपती या सर्वांनी माझ्या बाळासाठी एक हात मदतीचा पुढे करावा असं आवाहन त्यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
पाच महिन्यांच्या मुलीसाठी आई-वडिलांची धडपड, 16 कोटींच्या इंजेक्शनसाठी क्राउड फंडिंग
‘तीरा’च्या इंजक्शनसाठी सोळा कोटी रुपये जमले पण आता सरकारकडून हवीय ‘ही’ मदत
भारतात OLA चा जगातील सर्वात मोठा स्कूटर कारखाना, दर सेकंदाला तयार होणार एक ई-स्कूटर

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.