कोरोनाच्या काळात हेल्दी आणि फिट हृदयासाठी ‘हे’ करा सोपे उपाय

मुंबई | कोरोना विषाणूच्या या परिस्तिथीमध्ये आपल्या सर्वांची जीवन शैलीच बदलून गेली आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र या कालावधी मध्ये नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे.

याचबरोबर कोरोनाच्या महासाथीमुळे आरोग्याच्या इतर समस्यांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. लॉकडाऊन आणि करोना या काळामध्ये वयोवृद्ध लोकांना निरोगी आरोग्यासाठी काहीच करता येत नाही आहे.  यामुळे आता आरोग्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत.

याचबरोबर कोरोनाच्या धास्तीपायी आरोग्याकडे वयोवृद्ध लोकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांच्या हृदयाचे आरोग्य राखण्याचा धोका निर्माण होत असल्याचे समजतं आहे. परंतु काळजीचे कारण नाही आरोग्याच्या सवयी लावून घेऊन हृदयाचे विकार टाळता येऊ शकतात.

आज आम्ही तुम्हाला निरोगी हृदयासाठी कोणत्याही वयोगटातील लोकांनी घरच्या घरी अवलंबावेत असे सोपे उपाय सांगणार आहोत. यामुळे तुमचे हृदय निरोगी राहण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात हे सोपे उपाय…

कामात अधूनमधून ब्रेक घ्या –
कोरोनाच्य पार्श्वभूमीवर सगळे जण घरातूनच काम करत आहे. हे काम करत असताना अधूनमधून थोड्या वेळासाठी ब्रेक घेणं चांगले असते. त्यामुळे ताण कमी होऊन रिलॅक्स होता येते. हृदयाच्या आरोग्यासाठी असं करणं उपयुक्त ठरते.

व्यायाम करा –
हृदय व संपूर्ण शरीराचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी कोणताही व्यायाम उपयुक्त ठरू शकतो. दररोज ३० मिनिट व्यायाम करा. व्यायामाचे दररोज रुटीन ठरवून घ्या. यामुळे दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटण्यास मदत होईल.

आहार –
सर्वांत मह्त्त्वाची गोष्ट तुम्हाला चांगले आरोग्य हवे असल्यास यासाठी चांगला आहार घेणे अतिशय गरजेचे आहे. याचबरोबर हृदय निरोगी ठेवायचे तर आरोग्यदायी आहार घ्यावा. हिरव्या पालेभाज्या, फळांचा आहारात समावेश करतानाच जंक फूडचं प्रमाणाबाहेर सेवन टाळावे.

वजन –
आपल्या वयोगटानुसार, आरोग्याला पूरक एवढंच वजन असायला हवे. याचबरोबर वजन आणि बॉडी मास इंडेक्सच्या (बीएमआय) याची नोंद ठेवा. निरोगी शरीरातच हृदयाचं कार्य निकोपपणे चालेल. तसेच इतरही आजार बळावण्याची शक्यता उरणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या
अशी गेली अर्णबची तुरूंगातली पहीली रात्र; मच्छरांनी फोडल्यानंतर तळमळत होता..
…म्हणून अलका कुबलने आपल्या दोन्ही मुलींना चित्रपटसृष्टीपासून लांब ठेवलेय
संपादकाला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे शाहरुखला खावी लागली होती जेलची हवा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.