एखाद्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही टिना आणि अनिल अंबानीची लव्ह स्टोरी

८० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये टिना मूनीमचे नाव येते. टिनाने ८० च्या दशकामध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९७५ मध्ये टिनाने फेमिना मिस इंडीयाचा ताज जिंकला होता. त्यानंतर अभिनेता देवानंदची नजर त्यांच्यावर पडली आणि त्या अभिनय क्षेत्रात आल्या.

देवानंदने त्यांना अभिनय क्षेत्रात येण्याची संधी दिली. टिनाने देखील अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. १९७८ मध्ये टिनाने देवानंदच्या ‘देस परदेस’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. हा चित्रपट हिट झाला. या चित्रपटानंतर टिनाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

टिना मुनीम आज ६४ वर्षांची झाल्या आहेत. टिनाने प्रसिद्ध बिजनेस मॅन अनिल अंबानीसोबत लग्न केले. एक अभिनेत्री आणि बिजनेस मॅनची ही लव्ह स्टोरी खुपच रंजक आहे. दोघांची प्रेम कहाणी एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे. त्यामूळे बॉलीवूडच्या प्रसिद्ध प्रेम कहाण्यांमध्ये या कहाणीचा समावेश होतो.

या प्रेम कहाणीमध्ये प्रेम, भांडण, तक्रार वाद, आणि लग्न असे अनेक टप्पे होते. अनिल आणि टिनाची पहीली भेट एका लग्न सोहळ्यात झाली होती. लग्नात टिनाने काळ्या रंगाची साडी घातली होती. टिनाला पाहताच क्षणी अनिल त्यांच्या प्रेमात पडले होते. पण टिनाने मात्र सुरुवातीला अनिल अंबानीकडे दुलर्क्ष केले.

टिनाने तेव्हा करिअरवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला. परत एकदा एका कार्यक्रमामध्ये अनिल आणि टिनाची भेट झाली. टिनाला देखील अनिल आवडले होते. हळूहळू दोघांच्या भेटी वाढत गेल्या. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

अनिल अंबानीने ही गोष्ट घरच्यांना सांगितली. दोघांना लग्न करायचे होते. पण अनिल यांच्या घरच्यांनी या गोष्टीला नकार दिला. अभिनेत्री अंबानी कुटूंबाची सुन होणार नाही. असे घरच्यांनी सांगितले. कुटूंबाच्या दबावामूळे अनिलने टिनाशी ब्रेकअप केले.

पण जास्त काळ ते एकमेकांपासून दुर राहू शकले नाहीत. ब्रेकअपनंतर टिना बाहेर देशात गेल्या होत्या. पण अनिलचे प्रेम त्यांना परत एकदा भारतात घेऊन आले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. असे बोलले जाते की, टिनाशी लग्न करण्यासाठी अनिलने त्यांच्या घरच्यांशी भांडण केले होते.

अनेक प्रयत्नांनंतर १९९१ मध्ये टिना आणि अनिल अंबानीने लग्न केले. लग्नानंतर टिनाने फिल्मी करिअर सोडून दिले. टिनाने त्यांचा फॅमिली बिजनेस सांभाळायला सुरुवात केली. बिजनेसमधून टिना करोडो रुपये कमवते.

टिना सध्या लाइमलाईटपासून दुर आयूष्य जगत आहे. टिनाने सांगितले की, मी बॉलीवूडमध्ये होते तेव्हा ग्लॅमरस राहणे माझी गरज होती. मला सतत मेकअप करावे लागायचे. पण मी आत्ता जे काम करते त्यात ग्लॅमरची गरज नाही. म्हणून मी खुप साधी राहते.

महत्वाच्या बातम्या –

आईला घाबरुन प्रियंकाने तिच्या बॉयफ्रेंडला कपाटात लपवले होते; आईला समजल्यावर केली होती धुलाई

पुजा हेगडेकडे चाहत्याने केली न्यूड फोटोची मागणी; तिने कसलाही विचार न करता शेअर केला ‘तो’ फोटो

‘फॅन्ड्री’ चित्रपटातील शालूचा जिलेबी बाई गाण्यावरील डान्स पाहून चाहते झाले घायाळ; पहा व्हिडीओ

४२ वर्षांची असूनही अविवाहीत आहे शिल्पा शेट्टीची बहीण शमिता; ‘ह्या’ एका चुकीमूळे करिअर झाले होते खराब

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.