वडीलांसह शेतात मेहनत करताना दिसला चिमुकला तैमूर, पाहा बापलेकाचे शेतातील भन्नाट फोटो

मुंबई | बॉलिवूडमधील फेमस जोडी सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. २१ फेब्रूवारी रोजी सैफ आणि करीनाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यांना तैमूर नावाचा एक मुलगा आहे. तैमूरचे सोशल मिडियावर अनेक फोटो व्हिडिओ पाहायला मिळतात.

सैफ अली खान आणि करीनाचा मुलगा तैमुर नेहमी सोशल मिडियावर चर्चेचा विषय असतो. करीना नेहमी तैमूरचे व्हिडिओ, फोटो शेअर करत असते. करीना आता तैमूरचे चक्क शेतात काम करत असतानाचे फोटो शेअर केले आहे.

फोटोमध्ये पाहू शकता, शेतात अभिनेता सैफ अली खान हातात माती काढायचे फावडे घेऊन काम करत आहे. तर चिमुकला तैमूरही वडीलांसोबत मेहनत करताना दिसत आहे. करिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून बापलेकाचे फोटो शेअर केले आहे.

फोटो शेअर करत करीनाने ‘झाडे लावा पर्यावरण वाचवा’ असा संदेश दिला आहे. जगभरामध्ये २२ एप्रिल हा दिवस ‘जागतिक वसुंधरा दिवस’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. त्याच निमित्ताने करीनाने हे फोटो शेअर केले आहे.

अभिनेता सैफ अली खानने २०१२ मध्ये करीना कपूर सोबत लग्न केले होते. करीना कपूर सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे. बॉलिवूडमध्ये करीना आणि सैफ यांच्या जोडीला ‘सैफिना’ नावाने ओळखले जाते. लग्नाच्या चार वर्षानंतर त्यांनी तैमूरला जन्म दिला होता.

करीना कपूरने कभी खुशी कभी गम, तलाश, हलचल, बेवफा, ऐतराज, चुप चुप के, बॉडिगार्ड, सिंघम रिटर्न्स यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर सैफ अली खानने कच्चे धागे, हम साथ साथ है, सनम तेरी कसम, दिल चाहता है, रेस चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
काम न करता पठ्ठ्या घेत होत १५ वर्षे बसून पगार; पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर
ऑक्सीजनअभावी आणि ICU बेड न मिळाल्याने होणारे मृत्यू हे केंद्र सरकारचे पाप- राहूल गांधींचा थेट आरोप
मुंबईचा ऑक्सिजन मॅन! २२ लाखांची गाडी विकून आलेल्या पैशातून गरीबांना मोफत ऑक्सिजन वाटप

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.