टाईमपास ३ (Timepass 3): नुकताच टाईमपास ३ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता प्रथमेश परब यांची धमाल जोडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याचे पाहायला मिळते. ‘टाईमपास’ आणि ‘टाईमपास २’ च्या यशानंतर आता ‘टाईमपास ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे.
सोशल मीडियावर या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग्सची प्रचंड चर्चा सुरु होती. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रकाशित होतो अशी उत्सुकता चाहत्यांना लागलेली होती. शेवटी शुक्रवारी २९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही प्रेक्षक चित्रपटाचं भरपूर कौतुक करत आहेत, तर काही प्रेक्षक चित्रपटात काहीच नाविण्य नसल्याचं बोलत आहेत.
‘टाईमपास ३’ या चित्रपटाने दोन दिवसांत कोटींचा टप्पा गाठला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ८० लाखांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी १ कोटी १० लाख कमावले आहेत. म्हणजेच दोन दिवसात हा चित्रपट १ कोटी ९० लाखांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. यापुढेही यात वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रथम २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टाईमपास’ या चित्रपटात प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर पुढे २०१५ मध्ये ‘टाईमपास २’ प्रदर्शित झाला. यात प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापटने मुख्य भूमिका साकारली होती. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘टाईमपास ३’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता प्रथमेश परब यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
या तिन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. यात हृता दुर्गुळे पालवीच्या तर परमेश परब हा दगडूच्या भूमिकेत दिसत आहे. दगडू आणि पालवीची जबरदस्त केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १० कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईत वाढ होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
Alia bhatt: मी माझी ब्रा का लपवून ठेवायची? आलिया भटचा रोखठोक सवाल; सेक्सीस्ट कमेंट्सबद्दल म्हणाली..
मविआ’त बिघाडी! यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार; बड्या शिवसेना नेत्याची घोषणा
अब्दूल सत्तार म्हणाले कुत्रा हे चिन्ह जरी दिले तरी मी निवडून येईल; एकनाथ शिंदेंनी सांगीतला किस्सा
Sanjay Raut: पत्राचाळ प्रकरणात गैरव्यवहार झाला कसा? ED च्या बिनतोड युक्तीवादाने राऊतांच्या वकीलाची बोलती बंद