काळाने केला घात! मैदानात खेळाडूंच्या अंगावर कोसळली वीज; २ जणांचा जागीच मृत्यू, १ गंभीर जखमी

नागपूर। मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होऊन पावसासह अनेक ठिकाणी वीज कोसळयांच्या घटना देखील आल्या आहेत.

अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे जी ऐकून तुमचही मन सुन्न होईल. नागपूर जिल्ह्यातील चनकापूर इथं मैदानावर खेळणाऱ्या तीन युवकांच्या अंगावर वीज कोसळली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना शुक्रवारी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. काल संध्याकाळी 4 वाजल्यानंतर नागपूरमध्ये पावसाला सुरुवात झाली. यावेळी तन्मय दहिकर,अनुज कुशवाह, सक्षम गोठीफोडे हे तिघ मैदानात खेळण्यासाठी आले होते.

विजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस कोसळत होता. यावेळी शेडकडे धाव घेत असताना तन्मय, अनुज आणि सक्षम गोठीफोडे या तिघांवर वीज कोसळली.

वीज कोसळताच 12 वर्षांचा तन्मय दहिकर आणि 22 वर्षांचा अनुज कुशवाह या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सक्षम जखमी झाला असून त्याला नागपूर इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेनंतर आता परिसरात हळहळ व्यक्त होत असून यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मागील अनेक दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक गावांचे एकमेकांशी संपर्क तुटले आहेत तर अनेक गावांमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
पोलिसाच्या नोकरीत लागले नाही मन, आता बटाट्याची शेती करून कमवतोय वर्षाला ३.५ कोटी, वाचा.. 
सैफ अली खानच्या घरी बाप्पा विराजमान; तैमुरने स्वत:च्या हाताने बनवलेल्या मुर्तीचे सर्वत्र कौतुक
विराट कोहलीकडून कर्णधारपद काढून घेणार? रोहीतसह ‘ही’ नावेही नव्या कर्णधारासाठी शर्यतीत 
मोठी बातमी! बाळूमामाच्या नावाखाली अनेकांना लुटणाऱ्या मनोहर भोसलेला साताऱ्यातून अटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.