..तोपर्यंत विदेशी तबलीगींना भारत सोडता येणार नाही; सरकारचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

दिल्ली | मरकजमधील सहभागी झालेल्या तबलीगीमुळे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रसार झाला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात न्यायालयात खटले सुरू आहेत.

सरकारने उच्च न्यायालयाला या संदर्भात एक प्रतिज्ञापत्र पाठवले आहे. त्या पत्रात नमूद केले आहे जोपर्यंत त्यांच्यावरचे खटले संपत नाहीत तोपर्यंत ते आपापल्या देशात जाऊ शकत नाहीत.

प्रतिज्ञापत्रात सविस्तर लिहिले आहे की, कोरोना काळात सरकारने सांगितलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्याचे गुन्हे तबलिगींवर दाखल आहेत. आणि हे गुन्हे वेगवेगळ्या राज्यात दाखल आहेत. त्यांची सुनावणी होणे अद्याप बाकी आहे.

या सर्व प्रकरणांची सुनावणी होईपर्यंत त्यांना भारतातून आपल्या देशात जाता येणार नाही. केंद्र सरकारने हजारो तबलिगींना काळ्या यादीत टाकले असून त्यांचे व्हिसा रद्द केले आहेत. आतापर्यंत २६७९ जणांचे व्हिसा रद्द झाले आहेत.

२७६५ तबलिगींना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. २०५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९०५ तबलिगींचा तपास सुरू असून त्यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

दरम्यान, तबलिगींनी सरकारच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे त्याची सुनावणी १० जुलैला होणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.