४ वाघांनी घेरले पण एकाच्याही तावडीत नाही सापडला हा बदक, पाहा विडिओ

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे या व्हिडिओची सगळीकडे चर्चा सुरू आहे. वाघ म्हटले की आपल्या समोर भीती निर्माण होते. कारण वाघ हा अतिशय तरबेज असणारा प्राणी आहे. समोरच्याला काही समजायच्या आत ते शिकार करून मोकळे होतात. त्यांच्या ताकदीसमोर कोणत्याच प्राण्याचे चालत नाही.

पण वाघांची एका छोट्याशा बदकाने मात्र चांगलीच दमछाक केली आहे. सोशल मीडियावर वाघ आणि बदकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बघून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असेच म्हणाले लागेल.

चक्क ४ वाघांनी एका छोट्याशा बदकाला घेरले. असे असताना देखील बदक एकाच्याही तावडीत सापडले नाही. हे वाघ शेवटी थकले मात्र त्यांना हे बदक सापडले नाही. बदकाच्या हुशारीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. बदक पाण्यातून बाहेर येऊन आपली झलक वाघांना दाखवतो. ज्या वाघाच्या नजरेत बदक पडते तो वाघ त्या बदकाच्या दिशेने धावत सुटतो.

त्याला पंज्यात पकडण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्या हातात काहीच सापडत नाही. बदक तिथून गायब होतो. पुन्हा दुसऱ्या दिशेला तो दिसतो, तिथंही दुसरा वाघ जातो आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो पण तिथेही वाघ फेल. असे एकदा नाही दोनदा नाही तर बऱ्याच वेळा होते.

IFS अधिकारी रमेश पांडे यांनी आपल्या ट्विटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. पाण्यात राहणारे डुबकी मारण्यात तरबेज असतात. बदकाने चार वाघांना पाण्यात हरवले. केवळ हुशारीच्या जोरदार बदकाने या वाघांना चांगलेच पळवले आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना निसर्गाने सर्व जीवांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीने स्मार्ट बनवले आहे, असे कॅप्शन रमेश पांडे यांनी या व्हिडीओला दिले आहे. हा व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यामुळे तो व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

तुम्ही उडणारा खराखुरा ‘Harry Potter’ पाहिलाय का? नसेल पाहिला तर एकदा व्हिडिओ पहाच

‘माझ्याशिवाय आणीबाणी कोणालाच कळणार नाही’, म्हणत कंगनाने दिग्दर्शकाला दाखवला थेट बाहेरचा रस्ता

लग्न झाल्या झाल्या नवरीने नवऱ्यासाठी केला भन्नाट डान्स, पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.