जंगलातील प्राण्यांपासून दूर राहणं कधीही चांगलं असते. जंगलातील सर्वच प्राण्यांपासून धोका असतो असे नाही. परंतु जंगल म्हटले की डोळ्यासमोर सिंह, वाघ, लांडगा यांसारखे प्राणीच डोळ्यांसमोर येतात. सिंहानंतर जर जंगलातील प्राण्यांपैकी कोणापासून जास्त धोका असेल तर तो म्हणजे वाघ.
समोर कोणीही असो हे प्राणी केव्हा हमला करतील काही सांगता येत नाही. मग या प्राण्यांना ट्रेन केलेलं असले तरी. कारण थरकाप होईल अशीच एक घटना घडली आहे. सर्कसमध्ये प्राण्यांच्या वापर केला जातो. तसेच त्या प्राण्यांना ट्रेन केले जाते आणि सर्कसदरम्यान नियंत्रणासाठी प्रशिक्षक असतातच.
ट्रेन केलेल्या प्राण्याणेच जर प्रशिक्षकावर हल्ला केला तर? होय, अशीच एक घटना सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतून समोर आली आहे. व्हिडिओमध्ये वाघाने प्रशिक्षकावर हल्ला करतांना दिसत आहे. हल्ल्यानंतर वाघाने प्रशिक्षकाची मान पकडली आहे.
सुरवातीला एका पिंजऱ्याच्या आत प्रशिक्षक वाघाला काहीतरी सांगतांना दिसत आहे. तितक्यात दुसरा वाघ प्रशिक्षकाचे पाय पकडतो. त्यानंतर त्याच्यावर हल्ला केल्यानंतर प्रशिक्षकाच्या मानेलाच पकडतो. ४५ सेकंदाच्या या व्हिडिओत हे सगळं दृश्य कैद झाले असून चित्तथरारक आहे.
https://twitter.com/LaSamy65280885/status/1609149329796743169?s=20&t=51suOD-fG8esY3E6d70t7Q
हा थक्क करणारा व्हिडीओ इटलीच्या कुठल्यातरी ठिकाणाचा आहे असे सांगण्यात येत आहे. सदर व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी या व्हिडिओला पाहिले आहे. बघितल्यानंतर लोकं वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओला देत आहेत.
याच प्रतिक्रियांत एकाने लिहिले आहे की,’प्राणी हे खेळण्याचे साधन नाही, त्यांच्यासोबत खेळू नये. ते खूप धोकादायक आहेत,त्यांच्यापासून दूर राहणंच चांगले आहे.






