टीक टॉक स्टारने १४ वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याची देत होता धमकी

विशाखापट्टनम | आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टनममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मोठ्या टीक टॉक स्टारने एका १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी टीक टॉक स्टारला अटक करून त्याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

चिपदा भार्गव असं त्या टीक टॉक स्टारचं नाव आहे. त्याला फनबकेट भार्गव नावाने ओळखले जाते.  सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ शेअर करत त्याने प्रसिध्दी मिळवली आहे. एका १४ वर्षाच्या मुलीशी त्याची ओळख झाली आणि त्याने तिच्या सोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

शारिरीक संबंध प्रस्थापित केल्यानंतर मुलगी ४ महिन्याची गर्भवती राहिली.  मुलीच्या घरच्यांना समजल्यानंतर त्यांनी भार्गव विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर हैद्राबाद येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीक टॉकस्टार भार्गव आणि पीडित मुलीची टीक टॉकच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर भार्गवने त्या मुलीसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. मुलीने नकार दिल्यानंतर  व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

भार्गवला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी मुलीच्या कुटूंबाने केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
कंगणाने शेअर केला नैवेद्याच्या ताटाचा फोटो, ताटातील कांदा पाहून लोकांनी झापले
चित्रपटसृष्टी हळहळली! ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्करांचे कोरोनाने निधन
कोरोनावर उपचार करणारे डॉक्टर चोर, उपचाराच्या नावाखाली लुबाडतात; कॉमेडियनचं वादग्रस्त वक्तव्य

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.