‘पहले फुर्सत में निकल’ असं म्हणत सोशल मिडियावर धुमाकूळ घालणारा ‘हिंदुस्तानी भाऊ’ अर्थात विकास पाठक या पठ्ठ्याला बिग बॉस १३ मध्ये झळकताना पाहिले आहे. बिनधास्त बोलण्याच्या स्वभावामूळे तो सहस्पर्धकांच्या आणि प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला होता. आता ‘हिंदुस्तानी भाऊ’ वेब सीरिजमध्ये काम करून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
‘दौलतगंज’ असं या वेबसीरिजचे नाव असून याची शुटींग अयोध्येत सूरू झाली आहे. फिरोज खान दिग्दर्शित ही वेबसीरिज या वर्षात प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजमध्ये हिंदुस्तानी भाऊ याच्याबरोबर अभिनेता एहसान खान, दक्ष सिंह महत्तवपूर्ण भुमिकेत झळकताना दिसणार आहेत.
हिंदुस्तानी भाऊ यूट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुकवर प्रसिध्द आहे. त्याचे चाहतेही मोठ्या प्रमाणात आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर त्याने भारताविरोधी भाष्य करणाऱ्यांसाठी सहज एक व्हिडिओ बनवला. या व्हिडिओला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर त्याला ‘हिंदुस्तानी भाऊ’ या नावाने ओळखु लागले.
मराठी माणूस असलेला विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊ आईवडिल, पत्नी, मुलगा यांच्यासोबत मुंबईत राहतो. काही दिवसांपूर्वी हिंदुस्तानी भाऊच्या आईचे निधन झाले आहे. विकासचे लहानपन कष्ट करण्यात गेलं. त्याने कधी वेटर म्हणून तर कधी दारोदारी अगरबत्त्या विकून आपल्या कूटुंबाची जबाबदारी सांभाळली आहे.
महत्तवाच्या बातम्या-
‘विरुष्का’च्या घरी नव्या पाहुणीचं आगमन; विराटने दिली आनंदाची बातमी
भगवान रामाची भुमिका साकारण्यासाठी अरूण गोविल यांनी केले होते ‘हे’ काम, वाचून आश्चर्य वाटेल
श्रीदेवीचा राग कमी करण्यासाठी अमिताभ बच्चनने पाठवली होती टेम्पोभर गुलाबाची फुलं
विवाहीत असूनही बॉबी देओलच्या घरात राहते बॉलीवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री