थरारक! रस्त्यावर सायकलवरुन पडला तरूण, उठण्याचा प्रयत्न करताच मागून कार आली अन्… पहा व्हिडिओ

मुंबई। दैनंदिन घाई गडबडीचा जीवनात अनेक लोकांचे रस्त्यावर अपघात होताना आपण पाहत असतो. कोणी बाईकवरून पडलेला असतो तर कोणी कार ठोकतो. त्यामुळे अनेकजण गाडी चालवताना आपल्या जीवाची पर्वा करत असतात व गाडी चालवतात.

परंतु, कित्येक जणांचे काळजी घेऊनही अपघात होत असतात. गाडीचा स्पीड नियंत्रणात न राहिल्याने अपघात होत असल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. अशाच एका आगळ्यावेगळ्या अपघाताचा सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/reel/CQHcfOeBxLm/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती सायकलवरुन जात आहे, दरम्यान मागून येणारी एक गाडी त्याला धडक देते. त्याच्यासोबत आणखी काही लोक सायकलीवरुन जात होते. मात्र दरम्यान मागून एक चार चाकी वाहनाने एका सायकलला धडक दिली.

हे पाहून सायकल स्वाराच्या सोबत असलेले मित्र चिडतात आणि जोर-जोरात ओरडू लागतात. तेव्हा गाडी चालक मागून सायकल स्वाराच्या वरुन आपली गाडी चढवण्याचा प्रयत्न करतो. मात्र सुदैवाने सायकल स्वार या अपघातात बचावतो. हा व्हिडिओ नेमकी कुठला आहे हे अजूनही समजलेलं नाही.

मात्र हा व्हिडिओ 23 लाख लोकांनी लाइक केला. तर 6 कोटी लोकांनी हा व्हिडीओ आतापर्यंत पाहिला आहे. व अजूनही हा व्हिडिओ वाऱ्यासारखा तुफान व्हायरल होत आहे. मात्र मागून मुलाच्या अंगावर त्या चालकाने कार का चालवली हे अद्यापही समजलेलं नाही.

महत्वाच्या बातम्या
त्याने माझे क्लिवेज आणि मांड्यांना…; सुरवीन चावलाने सांगितला बॉलिवूडचा धक्कादायक अनुभव
ब्रेकिंग! अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, आता कार्यकारिणीत मांडला जाणार ठराव
डेल्टा + चा धोका! राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू होणार
काय सांगता! ATM मध्ये १४०० रुपये काढायला गेलेल्या महिलेला लागली कोट्यावधीची लॉट्री, जाणून घ्या….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.