Share

हृदयद्रावक! लग्नाची पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी गेलेल्या नवरदेवासह दोन तरुणांचा अपघातात मृत्यू

लग्नाची पत्रिका देवाला ठेवण्यासाठी गेलेल्या नवरदेवाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील हिंजवडी परिसरातील तीन तरुण देवदर्शनासाठी आणि लग्नाची पत्रिका देवाला ठेवण्यासाठी अक्कलकोट(Akkalkot), गाणगापूरला गेले होते. त्यावेळी अक्कलकोट गाणगापूर मार्गावर त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. (Three young man died in accident)

या अपघातात नवरदेवासह त्याच्या दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. आकाश ज्ञानेश्वर साखरे, दीपक सुभाष बुचडे आणि आशुतोष संतोष माने अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक सुभाष बुचडे याचे १८ जूनला लग्न होणार होते. या लग्नाची पत्रिका देवाला ठेवण्यासाठी दीपक बुचडे, आकाश साखरे आणि आशुतोष माने अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूरला गेले होते.

त्यावेळी बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट गाणगापूर मार्गावर या तीन तरुणांच्या कारचा आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात तीनही तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यू पावलेले तीनही तरुण हिंजवडी परिसरात वास्तव्यास होते.

या घटनेमुळे हिंजवडी परिसरात शोककळा पसरली आहे. दीपक सुभाष बुचडे याचे भाऊ चंद्रकांत बुचडे यांनी या प्रकरणात अक्कलकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याच्या शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे तीनही मृत तरुणांच्या कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लग्न अगदी काही दिवसांवर आले असताना नवरदेवाचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे हिंजवडी परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात देखील अशाच प्रकारच्या अपघाताची एक घटना घडली होती. देवदर्शनासाठी निघालेल्या कुटूंबावर काळाने घात केला होता.

जोतिबाच्या दर्शनाला निघालेल्या पवार कुटूंबियांच्या गाडीचा कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा येथे भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तसेच कुटूंबातील इतर जण गंभीर जखमी झाले होते. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भीषण अपघाताने पवार कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मैने प्यार कियाच्या सेटवर घमंडी सलमान लक्ष्याशी फटकून रहायचा; मग लक्ष्याने त्याची अशी जिरवली की..
मैने प्यार कियाच्या सेटवर सलमान लक्ष्मीकांत बेर्डे सोबत एक शब्दही बोलत नसायचा; खरे कारण आले समोर
वसंत मोरेंनी करून दाखवलं! राजीनामा दिलेल्या समर्थकाला राज ठाकरेंकडून हवं ते मिळवून दिलं

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now