तीन भाडखाऊ पक्षांनी २-३ जागा जिंकल्या म्हणजे लई मोठा पराक्रम नाही; उड्या मारायची गरज नाही

मुंबई । राज्यात आज पदवीधर निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला. तर भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते.
या विजयावर भाजप नेते निलेश राणे यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी महाविकास आघाडीवर टीका करताना निलेश राणेंची जीभ घसरली. ३ भाडखाऊ पक्ष एकत्र येऊन 2-3 सीट जिंकले म्हणजे त्यांना वाटले त्यांनी मोठा पराक्रम केला. सोयीची आघाडी एखाद दुसरी निवडणूक जिंकून देईल पण तो विजय ज्यास्त वेळ टिकत नाही.
हे ३ पक्ष एकटे लढले असते तर त्यांची काय अवस्था झाली असती हे वेगळे सांगायला नको म्हणून त्यांनी उड्या मारायची गरज नाही. असा घणाघात निलेश राणे यांनी ट्विटरवर केला आहे.
३ भाडखाऊ पक्ष एकत्र येऊन 2-3 सीट जिंकले म्हणजे त्यांना वाटलं त्यांनी मोठा पराक्रम केला. सोयीची आघाडी एखाद दुसरी निवडणूक जिंकून देईल पण तो विजय ज्यास्त वेळ टिकत नाही. ३ पक्ष एकटे लढले असते तर त्यांची काय अवस्था झाली असती हे वेगळं सांगायला नको म्हणून त्यांनी उड्या मारायची गरज नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 4, 2020
चंद्रकांत पाटील यांनी देखील हिंमत असेल तर एकटे लढा असा सल्ला दिला आहे. यावरून आता राजकारण तापले आहे. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
नागपूरची जागा तर पहिल्यांदाच भाजपच्या हातातून गेली आहे. तर पुण्यात देखील भाजपचा दारुण पराभव झाला आहे. यामुळे महाविकास आघाडीत आनंदाचे वातावरण आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी प्रचाराचे योग्य नियोजन करून आपली ताकद पणाला लावली होती.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.