मोठी बातमी! भिवंडीत इमारत कोसळली; ८ जणांचा मृत्यू 

मुंबई | आज पहाटे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे मोठी दुर्घटना घडली आहे. पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास पटेल कंपाऊंड भागातील तीन मजली जिलामी इमारत कोसळली आहे.

तसेच या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. याचबरोबर कोसळलेल्या इमारती खाली अजून २० ते २५ नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याचबरोबर या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि NDRF टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या दुर्घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीत २५ कुटुंबे राहत असल्याची माहिती मिळत आहे. याचबरोबर पहाटेच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेमुळे ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तसेच सुरुवातीला त्या भागात पाऊस सुरू असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे. परंतु, बचावकार्य वेगाने सुरू आहे. आतापर्यंत एनडीआरएफच्या जवानांनी २० जणांना सुखरूप ढिगाऱ्याबाहेर काढले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

…तर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे व सुप्रिया सुळेंना सहा महीने तुरूंगात बसावे लागणार
बालकलाकाराचे काम करण्याऱ्या ‘या’ हिरोईनचे नाव वेश्या व्यवसायामध्ये समोर आले होते
प्रचंड टिकेनंतर कांदा निर्यातबंदीवर सरकारची माघार! ‘ह्या’ निर्यातीला दिली परवानगी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.